वांद्रे-वरळी सागरी लिंकवरून एकाची समुद्रात उडी !

वांद्रे-वरळी सागरी लिंकवरून एका व्‍यक्‍तीने आपली गाडी तेथे थांबवून समुद्रात उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांनी शोध मोहीम चालू केली आहे.

मुख्‍यमंत्र्यांच्‍या गाड्यांच्‍या ताफ्‍यात शिरणार्‍याला अटक आणि जामीन !

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या गाड्यांच्‍या ताफ्‍यात शिरण्‍याचा प्रयत्न करणारा चालक जी.पी. रझाक याला वांद्रे पोलिसांनी नुकतीच अटक केली.

मुंबई अग्‍नीशमन दलामध्‍ये २ यंत्रमानवांचा समावेश होणार !

मुंबई अग्‍नीशमन दलाच्‍या ताफ्‍यात लवकरच आणखी दोन यंत्रमानव (फायर रोबो) भरती होणार आहेत. जेथे मनुष्‍य पोचू शकत नाही, अशा अत्‍यंत धोकादायक ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’ने या यंत्रमानवांच्‍या साहाय्‍याने आग विझवण्‍याचे काम करता येईल.

रेल्वे पोलिसाकडून पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार : ४ जणांचा मृत्यू !

रेल्वे सुरक्षा दलाचा हवालदार चेतन सिंह याने पोलीस अधिकारी आणि प्रवासी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा आणि ३ प्रवासी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह याला अटक केली आहे.

बंदी नसलेल्या पुस्तकातील लिखाण वाचून दाखवणे कायद्याने गुन्हा ठरत नाही ! – अजय सिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या प्रकरणी त्यांनी हे मत व्यक्त केले. गांधींचा एवढा पुळका होता, तर काँग्रेसने या पुस्तकावर बंदी का घातली नाही ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

#Exclusive : (म्हणे) ‘दिवाळीत फोडण्यात येणारे फटाके, ही पर्यावरणाची सर्वांत गंभीर समस्या !’ – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषण मोजणे आणि मशिदींवरून नियमित वाजणार्‍या भोंग्यांकडे दुर्लक्ष करणे, हा उघड पक्षपातीपणा आहे. सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

ठाणे येथे टी.एम्.टी.च्‍या बसगाडीला आग; ५० प्रवाशांची सुटका !

स्‍थानिक रहिवासी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्‍या साहाय्‍याने ५० प्रवाशांना बसगाडीच्‍या मागील दरवाज्‍यातून सुखरूप बाहेर काढण्‍यात आले.

मुंबईचे शिल्‍पकार आणि आधुनिकतेचा पाया घालणारे जगन्‍नाथ शंकरशेठ !

१० फेब्रुवारी १८०३ या दिवशी जन्‍माला आलेले जगन्‍नाथ शंकरशेठ यांनी मुंबईचे स्‍वरूप पालटून त्‍या ठिकाणी आधुनिक मुंबई शहराची पायाभरणी केली. म्‍हणूनच ‘मुंबईचे शिल्‍पकार’ म्‍हणून त्‍यांचे यथार्थ वर्णन केले जाते.

जॉन्सन बेबी पावडर आस्थापनावर कारवाई करण्यात दिरंगाई नाही ! – धर्मरावबाबा आत्राम, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

उच्च न्यायालयाने उत्पादन बंदीचे पारीत केलेले आदेश रहित केले होते. त्यानंतर मे. जॉन्सन ॲण्ड जॉन्सन प्रा. लि. यांनी स्वतःहून उत्पादन परवाना प्रशासनास प्रत्यार्पित करून जॉन्सन बेबी पावडर याचे उत्पादन महाराष्ट्र राज्यात बंद केले आहे.

मुंबई येथील नूर धर्मादाय रुग्णालयातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी विधानसभेत आवाज उठवला ! – सौ. यामिनी जाधव, आमदार, शिवसेना

रुग्णांकडे दुर्लक्ष करणार्‍या खासगी, धर्मादाय किंवा कोणत्याही रुग्णालयांवर लोकप्रतिनिधींचा वचक असला पाहिजे, तरच लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवतात, असा पायंडा पडेल. चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी ही लक्षवेधी मांडून आवाज उठवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार सौ. यामिनी जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.