शिक्षणमंत्री तावडे यांच्या नावाने परीक्षेविषयी पसरवले जाणारे ‘ते’ ट्वीट चुकीचे – विद्यापीठ

३ मेच्या दिवशी संध्याकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाने विद्यापिठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाचा पेपर रहित झाल्याचे खोटे ट्वीट पसरवण्यात आले होते. यानंतर तावडे यांनी स्वतः ट्वीट करत त्यांचे खाते हॅक झाले नसून त्यांच्या…..

प्रश्‍नपत्रिकेत २५ गुणांचे ४ प्रश्‍न चुकीचे असल्याचे ऐनवेळी कळल्याने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांचा गोंधळ

मुंबई विद्यापिठामध्ये ८ जानेवारी या दिवशी चालू असलेल्या विधी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रातील ‘मालमत्ता हस्तांतरण कायदा’च्या मराठी प्रश्‍नपत्रिकेतील २५ गुणांचे ४ प्रश्‍न चुकीचे होते

उत्तरपत्रिका तपासणीतील दोषींच्या वेतनावर दंडात्मक कारवाई करावी ! – उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करणार्‍या, तसेच पुनर्मूल्यांकनाच्या कामाशी निगडित असलेल्या प्राध्यापकांकडून वारंवार होणार्‍या चुकांचा त्रास विद्यार्थ्यांना होत असेल, तर अशांना मानधन न देता त्यांच्या वेतनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

चुकीच्या उत्तरपत्रिका पडताळणारे परीक्षक मोकळे !

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करतांना होणार्‍या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. असे असतांनाही मूल्यांकनात चुका करणार्‍या परीक्षकांवर मुंबई विद्यापिठाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

(म्हणे) ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून का रोखले जाते ?’ – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे असा निर्णय दिला आहे; मात्र त्यांना प्रवेश करण्यापासून का रोखले जाते ? प्रथा-परंपरा यांच्या नावाखाली महिलांना मंदिर प्रवेशास आडकाठी केली जात आहे.

मुंबई विद्यापिठाकडून ‘एल्एल्बी’च्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणूक

मुंबई विद्यापिठातील ‘एल्एल्बी’चा विद्यार्थी असलेल्या अभिनय म्हात्रे याला विद्यापिठाची चूक असूनही अपमानास्पद वागणूक मिळाली. अभिनय याला ५ सत्रांत १० ‘केटी’ लागल्या होत्या; मात्र पुनर्मूल्यांकनात चांगले गुण मिळाले.

उत्तरपत्रिका तपासणीत निष्काळजीपणा केल्यामुळे मुंबई विद्यापिठाचे ३५ सहस्र विद्यार्थी अनुत्तीर्ण !

गेल्या वर्षीचा निकाल आल्यानंतर मुंबई विद्यापिठाच्या ९७ सहस्रांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुन्हा पडताळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांपैकी ३५ सहस्र म्हणजेच अनुमाने ३६ टक्के विद्यार्थ्यांना विद्यापिठाने चुकून अनुत्तीर्ण केले होते. माहिती अधिकारात ही गोष्ट समोर आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी सांगितले.

धर्मांध विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून उत्तरपत्रिका पालटणार्‍या मुंबई विद्यापिठाच्या कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्याला अटक

मुंबई विद्यापिठाच्या कलिना येथील संकुलात गरवारे इन्स्टिट्यूटच्या मास्टर ऑफ सबस्टानशिल डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका पालटणार्‍या संदीप पालकर आणि संगमेष कांबळे या २ कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन या धर्मांध विद्यार्थ्याच्या सांगण्यावरून त्यांनी हा गैरप्रकार केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुपदी प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती

मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरुपदी माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी नियुक्तीची घोषणा केली.

आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत आवाज उठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्रातील राष्ट्रद्रोही विषयावरील परिसंवाद रोखला

मुंबई विद्यापिठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चाचत्रातील ‘भारतीय सैनिकांनी काश्मीरचा घेतलेला ताबा आणि तेथील महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार’ या राष्ट्रद्रोही विषयावरील परिसंवादाच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवून भाजपचे आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी हा परिसंवाद रोखला.


Multi Language |Offline reading | PDF