‘ओमिक्रॉन’ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कडक निर्बंध लागू !

प्रत्येक कोविड केंद्राचे लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी मुखपट्टीचा वापर न करणार्‍यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दिवसाला २५ सहस्र जणांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.

मुंबई महापौर काँग्रेसच्या पाठिंब्याविना होणार नाही ! – नसीम खान, माजी मंत्री, काँग्रेस

१७ नोव्हेंबर या दिवशी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.

‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल २४ घंट्यांत मिळण्याच्या शासनाच्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार उघड !

राज्यातील कोरोना चाचण्यांच्या संदर्भात ‘२४ घंट्यांत कोरोनाचा अहवाल’ असे शासनाचे धोरण असूनसुद्धा त्याला शासकीय रुग्णालयांकडूनच हरताळ फासला जात आहे.

मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवणार !

वर्ष २००१ च्या जनगणनेनुसार यापूर्वी असलेली २२७ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या ३.८७ टक्के इतकी वाढली आहे.

वाळकेश्वर (मुंबई) येथील बाणगंगा कुंडातील सहस्रावधी मासे मृत

देवस्थान आणि महानगरपालिका प्रशासन यांनी एकत्रितरित्या येथे स्वच्छता राखण्याविषयी धोरण ठरवणे आवश्यक आहे; अन्यथा हिंदूंच्या धार्मिक विधींविषयी समाजातही चुकीचा संदेश जाईल !

मुंबईला तिसर्‍या लाटेचा धोका नाही !

मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

सागरी किनारा मार्गाच्या कामात १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबई महापालिका हे काम करत असून या कामाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी आणि सल्लागार आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुंबईमध्ये ७ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने धार्मिक स्थळे उघडणार !

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे मुंबईतील प्रमाण ९७ टक्के इतके आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे ४ सहस्र ८१० रुग्ण आहेत.

देवतेची मूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मूर्तीकारांची नोंदणी २ वर्षांसाठी रहित करणार ! – मुंबई महानगरपालिका

उपआयुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई पोलीस दल, ‘नीरी’ संस्था, बृहन्मुंबई सार्वजनिक गणशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, बृहन्मुंबई मूर्तीकार संघ आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईत अवैधपणे पैसे वसूल करणार्‍या ‘क्लीनअप मार्शल’वर गुन्हे नोंद करणार ! – महापौर

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घातल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्याचे अधिकार ‘क्लीनअप मार्शल’ला दिले आहेत; परंतु ते अनेकांना दंडाची पावती न देता त्यांच्याकडून १०० ते १५० रुपये घेतात आणि त्यांना सोडून देतात.