कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मालमत्ता कर वृद्धी करणार !

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, मालमत्ता करात दर ३ वर्षांनी वृद्धी केली जाते; मात्र कोरोनामुळे गेली २ वर्षे मालमत्ता करात वृद्धी करण्यात आली नव्हती.

वाहनतळासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिलेच शहर ! – महापालिका आयुक्त

मुंबईतील वाहनतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ नेमण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचा ४५ सहस्र ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर !

मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २०० शिवयोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील ३ सहस्र ५०० उपाहारगृहांना कचर्‍याकरता वापरकर्ता शुल्क आकारण्यात येणार आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ‘अग्नीसुरक्षा ऑडिट’ची माहिती देण्यास मुंबई महानगरपालिकेची टाळाटाळ !

हा प्रकार महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराविषयी संशय निर्माण करणारा आहे. आगीसारख्या संवेदनशील घटनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असेल, तर कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कारवाई व्हायला हवी !

रस्त्यावर थुंकणारे आणि कचरा फेकणारे यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महानगरपालिका १ सहस्र ‘क्लीन-अप मार्शल’ नियुक्त करणार !

आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी जनतेला स्वच्छता, शिस्त न शिकवल्याचा आणि पर्यायाने नागरिकांच्या मनात राष्ट्राविषयी प्रेम निर्माण न केल्याचा हा परिणाम आहे !

मुंबई महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक संमती

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत.

पीओपींच्या मूर्तीविषयी ‘सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ची मुंबई महापालिकेसह बैठक पार पडली !

या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरीस मूर्तींविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ज्या सूचना (गाईडलाईन्स) दिल्या आहेत, त्यावर चर्चा झाली.

मुंबईकरांना महापालिकेच्या ‘ॲप’द्वारे विविध ८० सुविधा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

नागरिकांना घरबसल्या ‘गणेशोत्सव मंडप अनुमती’, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक आदी माहिती व्हॉट्सॲपवर सहज उपलब्ध होतील.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव !

नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यासह पाच सदस्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे.