रा.स्व. संघामुळे ईशान्येकडील राज्ये आज भारतात आहेत ! – सरसंघचालक

काही वर्षांपूर्वीपर्यंत ईशान्येकडील राज्ये भारतापासून वेगळी होतील, आसामचे काश्मीर होईल, अशी भीती होती. ईशान्येकडील राज्यांत संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यामुळे परिस्थिती पालटली. ५० वर्षांपूर्वी काही स्वयंसेवकांनी तिथे जाऊन सेवाकार्य चालू केले आणि आजही ते चालू आहे.

आरक्षणावर विरोधक आणि समर्थक यांच्यात चर्चा व्हायला हवी ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आरक्षणाच्या बाजूने बोलणार्‍यांनी आरक्षणाला विरोध असणार्‍यांची भूमिका लक्षात घेऊन त्यांची मते मांडायला हवीत. तसेच विरोध करणार्‍यांनीही समर्थन करणार्‍यांची बाजू ऐकायला हवी.

(म्हणे) ‘सत्ता आली, तर सरसंघचालक मोहन भागवत यांना कारागृहामध्ये टाकू !’ – प्रकाश आंबेडकर

बिहारमधील एका खासदाराला एके ४७ बाळगल्याच्या प्रकरणी कारागृहामध्ये जावे लागले आहे. मोहन भागवत यांच्याकडेही एके ४७ आहे.

देशभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र ! – सरसंघचालक

देशभरात हिंदु धर्म आणि संस्कृती यांना अपकीर्त  करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. जमावाकडून होणार्‍या हत्यांच्या नावाखाली समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम चालू आहे.

संस्कृत ही देशातील सर्व भाषांना जोडणारी कडी होय ! – सरसंघचालक मोहन भागवत

जगातील सर्वाधिक पुरातन देश म्हणून भारताची ओळख आहे. हा देशाचा पुरातन इतिहास, येथील संस्कृती, परंपरा वहन करण्याचे काम संस्कृत भाषेमुळे झाले आहे.

पश्‍चिम बंगालमधील हिंसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी दंडशक्तीचा वापर करावा लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

आज पश्‍चिम बंगालमध्ये समाजा-समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेचा दुरुपयोग ही तर लोकशाहीची थट्टा आहे. काही शक्ती तेथे अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

(म्हणे) ‘जातीभेद नष्ट झाल्यावर भारत विश्‍वगुरु होईल !’- सरसंघचालक

चैतन्यभूमी असलेल्या भारतात मोक्षाची वाट दाखवणारे अनेक संत होते. त्यामुळे जगभरातील जिज्ञासू आणि मुमुक्षू भारतात येत. भारत आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न होता; म्हणून तो विश्‍वगुरु होता ! हे लक्षात घेऊन सरसंघचालकांनी भारताला आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

वेदशक्तीमुळे जगाचे लक्ष भारताकडे आहे ! – मोहन भागवत, सरसंघचालक

वेदांसारख्या आध्यात्मिक संपन्नतेमुळे विदेशातील लोक भारतात येतात, तर भारतात निधर्मीवादाच्या नावाखाली बुद्धीप्रामाण्यवादी त्याची हेटाळणी करतात. भारताचे आध्यात्मिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी शासनाने जनतेला धर्मशिक्षण देऊन धर्माभिमान जागृत करायला हवा. सरसंघचालक यासाठी पुढाकार घेतील का ?

अयोध्येत राममंदिर होणे, हे राष्ट्रकार्यच ! – मोहन भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघप्रणीत भाजपने राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर भाजपला हिंदूंनी निवडून दिले, तरीही भाजप या आश्‍वासनाची पूर्तता करत नाही, हे दिसत असतांना ५ वर्षांत भागवत यांनी भाजप सरकारवर मंदिर उभारण्याविषयी वारंवार विचारणा का केली नाही ?

(म्हणे) ‘कोणाचेही सरकार आले, तरी राममंदिर होईल !’ – सरसंघचालक मोहन भागवत

राममंदिर बांधण्याची धमक संघासहित कुठल्याही मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेमध्ये नाही, हेच वारंवार सिद्ध झाल्याने हिंदू आता भाजप, विहिंप आणि संघ यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे !


Multi Language |Offline reading | PDF