भारतात आता ३ जी आणि ४ जी भ्रमणभाष संचांची निर्मिती होणार नाही !

भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर या दिवशी भारतातील ‘५जी’ भ्रमणभाष सेवेचे उद्घाटन केले. देशातील ‘जीओ’ आणि ‘एअरटेल’ या आस्थापनांनी देशात या सेवेचा प्रारंभ केला आहे. मुंबईसह देशातील ८ शहरांत सर्वप्रथम ही सेवा मिळणार आहे.

दिवसभरात ४ घंटे भ्रमणभाष हाताळणार्‍या पालकांमधील चिडचिडेपणात वाढ ! – कॅनडातील संशोधनाचा निष्कर्ष

विज्ञानाने कितीही प्रगती केली आणि मनुष्यांसाठी विविध सुखसोयी निर्माण केल्या, तरी त्यातून मनुष्याला शाश्‍वत आणि चिरकाल आनंद न मिळता मनुष्य, समाज आणि वातावरण यांची हानीच होत आहे, हेच गेल्या १० वर्षांत दिसून येत आहे. यावरून आतातरी विज्ञानवादी विज्ञानाचा फोलपणा समजतील का ?

भारत-बांगलादेश सीमेवर सापडले  ३५९ भ्रमणभाष संच

बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुखदेवपूर येथे भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ३५९ भ्रमणभाष संच जप्त केले. सुखदेवपूर येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांना १० ते १२ तस्कर काही गठ्ठे घेऊन जात असल्याचे दिसले.

 ब्रिटनमध्ये ‘स्मार्टफोन’चा वापर करणारी ६५ टक्के मुले १९ व्या वर्षी होतात नैराश्यग्रस्त !

वैज्ञानिक उपकरणांचा अतिवापर केल्याचाच हा दुष्परिणाम ! अध्यात्मविहीन विज्ञानाचे उदात्तीकरण हेच या सर्व समस्यांना कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या !

सामाजिक माध्यमांत सक्रीय राहिल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, तर विद्यार्थिनी लैंगिक शोषणाच्या बळी ! – समूपदेशकांचे मत

राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !

पुणे शहरातील गर्दीमध्ये भ्रमणभाष चोरणारे जेरबंद !

शहरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीचा अपलाभ घेत भ्रमणभाष चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीवान बनवणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना !

शासकीय कामानिमित्त दूरभाष करतांना ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याविषयी वन विभागाकडून शासन आदेश निर्गमित !

दूरभाष किंवा भ्रमणभाष यांद्वारे संभाषण करतांना अभिवादन करतांना वन विभागाचे सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांनी ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ या शब्दाचा वापर करावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

१२ सहस्र रुपयांपेक्षा अल्प किमतीच्या चिनी भ्रमणभाष संचांवर येणार निर्बंध !

शत्रूराष्ट्राच्या भ्रमणभाष संचांच्या विरोधात भारत शासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे. आता राष्ट्रप्रेमींनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार घातला पाहिजे !

वीजदेयक भरले नसल्याचा संदेश पाठवून अधिकोषातील पैसे लांबवणारी टोळी महाराष्ट्रात कार्यरत !

नवीन ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ करून वीज शुल्क न भरता बँकेने पुरवलेल्या ‘अ‍ॅप’द्वारे वीज शुल्क भरल्यास फसवणूक होणार नाही.