भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांद्वारेही कोरोना पसरू शकतो ! – प्रा. सरमन सिंह आणि शास्त्रज्ञ रजनीकांत

भ्रमणभाष, संगणक आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) आदी प्रतिदिन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याद्वारेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे कोरोनाची लागण झालेले रुग्ण तुमच्या आजूबाजूला असतील, तरच हा संसर्ग या उपकरणांच्या माध्यमातून पसरू शकतो.

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगून एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला

‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.

देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग !

अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड : घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

चीनमध्ये भ्रमणभाष वापरणार्‍यांची संख्या अचानक २ कोटींनी घटली

चीनच्या वुहान शहरातून चालू झालेल्या कोरोनामुळे जगभरात ३ लाख ७९ सहस्र ८० जण बाधित झाले आहेत, तर १६ सहस्र ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये ३ सहस्र २७० जणांचा मृत्यू झाला आहे; मात्र ही संख्या अल्प असल्याचे आता म्हटले जात आहे.

कोरोनाविषयीची माहिती भ्रमणभाषवर उपलब्ध ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाने जगात थैमान घातले आहे; मात्र अनेकांना त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती नाही. कोरोनाविषयीची वस्तूनिष्ठ माहिती देण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याद्वारे आता एका ‘क्लिक’वर ही माहिती मिळणार आहे.