उत्तरप्रदेश विधानसभेने ६ पोलिसांना सुनावली १ दिवसाच्या कारावासाची शिक्षा !

उत्तरप्रदेशच्या विधानसभेत भाजपचे तत्कालीन आमदार सलील बिश्‍नोई यांनी १९ वर्षांपूर्वी आमदाराचा विशेषाधिकार भंग झाल्याच्या प्रकरणी तक्रार केली होती.

गड-दुर्गांच्‍या दुर्दशेला कारणीभूत घटक !

गड-दुर्गांच्‍या दुःस्‍थितीच्‍या माध्‍यमातून शिवरायांचा ज्‍वलंत इतिहास खितपत पडलेला आहे ! त्‍याला पुनर्झळाळी मिळण्‍यासाठी सर्वंकष स्‍तरावर प्रयत्न व्‍हावेत !

तारांगणाच्या प्रवेशद्वारावर नगरपरिषदेच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांचा आरोप

डिसेंबर मासात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करून तारांगणचे उद्घाटन करण्यात आले, आज तारांगणमध्ये रत्नागिरी नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत आहेत; मात्र अद्यापही मुख्याधिकार्‍यांच्या निदर्शनास वरील गोष्ट का आली नाही ?

पुरातत्व विभागाची हिंदु विधीज्ञ परिषदेला माहिती राज्य पुरातत्व विभागातील ३०० पैकी १३२ पदे रिक्त !

पुरातत्व विभागातील रिक्त पदे भरण्याविषयी ६ एप्रिल २०२२ या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्यमंत्री यांना पत्र पाठवले होते.

विजयदुर्गाच्या ठिकाणची आरमाराची गोदी आणि समुद्रातील भिंत यांचे जतन अन् संवर्धन यांविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या शिवकालीन विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेरील भागात शत्रूंच्या जहाजांना अडवण्यासाठी समुद्राच्या तळाशी भिंत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी आरमाराची गोदीही आहे

कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?

भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या सोडवू न शकणारी शासकीय यंत्रणा जनहितकारी कारभार काय करणार ?

यशवंतगडानजीकचे अवैध उत्खनन आणि बांधकाम यांच्या विरोधातील उपोषण ८ दिवसांच्या उपोषणानंतर प्रशासनाच्या आश्वासनामुळे शिवप्रेमींचे आंदोलन स्थगित

आम्ही करत असलेले आंदोलन वैयक्तिक नसून महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवछत्रपतींच्या गडांविषयी आहे. छत्रपतींच्या गडांच्या एका दगडालाही कुणी हात लावू नये, असे कडक कायदे करावेत, अशी आमची शासनाला विनंती आहे.

यशवंतगडाच्‍या रक्षणासाठी चालू असलेल्‍या आमरण उपोषणाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन लज्‍जास्‍पद !

यशवंतगडावरील अवैध बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील राजन बापू रेडकर अन् भूषण विलास मांजरेकर, तसेच त्यांमचे सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी गडाच्यां प्रवेशद्वारावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला.’

बांगलादेशातून पलायन करून आलेले ख्रिस्ती मिझोराममध्ये फुटीरतवादी संघटनेला करत आहेत साहाय्य !

आतापर्यंत बांगलादेशी घुसखोर मुसलमानच देशात अवैध रहात असून कारवाया करत असल्याचे समोर येत असतांना आता तेथील ख्रिस्तीही भारतात येऊन भारत विरोधी कारवाया करत असल्याचे समोर येणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्जास्पद आहे !

पंजाबच्या कारागृहात सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये झालेल्या हाणामारीत दोघांचा मृत्यू, तर तिसरा घायाळ

आप सत्तेवर असलेल्या पंजाबमध्ये सर्वत्रच कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे लक्षात घेता सरकारने आता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी !