विदेशांतून आलेल्या सर्वांची पडताळणी झालीच नाही ! – मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा

गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.

कोरोनापुढे हतबल पाकिस्तान !

‘आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्य्ररेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर त्यांचे पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊले उचलत आहोत, असे सांगत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी दळणवळण बंदी…

चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांतात हिंसाचार

गेल्या ३ मासांपासून येथे लागू केलेल्या दळणवळण बंदीमध्ये चीन सरकारने काही काळासाठी सूट दिल्यामुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे येथे गर्दी वाढून तणाव निर्माण झाला आहे.

झारखंड आणि तमिळनाडू येथील मशिदींमध्ये विदेशी मौलवी सापडले !

भारतातील बर्‍याच मशिदींमध्ये देशविघातक कारवाया चालतात, असा गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. त्याच वेळी अशांवर कारवाई केली असती, तर ही वेळ आली नसती. अशा मशिदी आणि मौलवी यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने कृती करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

पाटलीपुत्र येथे मशिदीमध्ये रहात असलेले १२ विदेशी मुसलमान पोलिसांच्या कह्यात

बिहारच्या पाटलीपुत्र या राजधानीमधील एका मशिदीमध्ये  विदेशी मुसलमान असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा मारून १२ विदेशी मुसलमानांना कह्यात घेतले आहे. हे सर्व जण १२ मार्च या दिवशी येथे पोचले होते; मात्र त्याविषयीची कोणतीच कल्पना पोलिसांना देण्यात आली नव्हती…..