महाराष्‍ट्राला दिशा देणारे मराठी साहित्‍य संमेलन अमळनेर (जळगाव) येथे होईल ! – मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. यातून विविध विषयांवर मंथन होईल. यामुळे हे संमेलन महाराष्‍ट्राला दिशा देणारे ठरेल, असा विश्‍वास राज्‍याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्‍यवस्‍थापन मंत्री अनिल पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

मुंबईतील ‘शिवसदन’ सोसायटीचा इंग्रजी भाषेतील फलक मराठी भाषेत लावला !

तृप्ती देवरूखकर यांना घर नाकारण्यात आल्याचे प्रकरण
मराठीप्रेमींच्या मागणीचा परिणाम !

मुंबई येथे मराठी महिलेला घर नाकारणार्‍या सचिवाची पदावरून हकालपट्टी !

मराठीजनांवर केला जाणारा अन्याय, तसेच मराठी भाषेची सर्वत्र होणारी गळचेपी रोखण्यासाठी मराठीप्रेमींनी संघटित व्हावे !

मराठी असल्‍यानेही मला घर नाकारण्‍यात आले होते ! – पंकजा मुंडे-पालवे, राष्‍ट्रीय सचिव, भाजप

भाषावाद, प्रांत या विषयावर मी कधी भाष्‍य करत नाही; परंतु सध्‍याची राजकीय आणि सामाजिक परिस्‍थिती पाहून मन खिन्‍न होते.’’

भाषेचा सन्‍मान करणे यात विरोध करण्‍यासारखे काय होते ? – राज ठाकरे

मराठी पाट्यांविषयी जागृती माझ्‍या महाराष्‍ट्र सैनिकांमुळे आली. त्‍यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तुम्‍ही सतर्क राहिलात, तसेच यापुढेही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन या वेळी राज ठाकरे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या नावांची पाटी मराठीत लावणे अनिवार्य !

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तिथे व्यवसाय करतांना तुम्हाला तो मान्य करायला काय हरकत आहे ?-सर्वोच्च न्यायालय

मी मराठी असतो, तर अधिक समृद्ध झालो असतो ! – परेश रावल, अभिनेता

रावल पुढे म्‍हणाले की, ‘महाराष्‍ट्र कल्‍चरल सेंटर’शी माझे नाते जुने आहे. त्‍यांचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजराती भाषेत केले होते, तसेच मराठीतील गाजलेल्‍या अनेक नाटकांचे प्रयोग आम्‍ही गुजराती रंगभूमीवर सादर केले आहे

अकृषी विद्यापिठांकडून इंग्रजी अभ्‍यासक्रमाचे मराठीतून भाषांतर नाही !

यावरून अकृषी विद्यापिठांना मराठी भाषेविषयी किती आपुलकी आणि प्रेम आहे, हे दिसून येते.
मराठीत भाषांतर न करणार्‍या विद्यापिठांवर कारवाई केली पाहिजे.

सप्टेंबरपर्यंत मराठी भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विद्यापिठांना सूचना !

मुंबई आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था) कडून विद्यापिठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटी समवेत सामंजस्य करारही केले आहेत.

‘चकोते’ आस्थापनाच्या ‘रस्क’च्या वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दूतून माहिती !

नांदणी येथील श्री गणेश बेकरीच्या ‘चकोते प्रीमियम रस्क’च्या (टोस्टच्या) वेष्टनावर केवळ इंग्रजी आणि उर्दू भाषांतून माहिती देण्यात आली आहे.