मुंबई-गोवा महामार्गावरील अशुद्ध फलकांद्वारे मराठीची पायमल्ली करणार्यांवर कारवाई करा !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे…