‘खोटे बोलून राजकीय लाभ उठवण्यासाठी वडिलांचे नाव घेण्याचा असंवेदनशील प्रयत्न बंद करा !’

‘खोटे बोलून राजकीय लाभ उठवण्यासाठी माझ्या वडिलांचे नाव घेण्याचा असंवेदनशील प्रयत्न परत झालेला आहे. ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. अशी विधाने करणे टाळावे’, असे प्रत्युत्तर स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना दिले आहे.

अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांची गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप यांच्या विरोधात राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे तक्रार

स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचा भाजप आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे अनधिकृतपणे राजकीय लाभ उठवत आहेत आणि यामुळे आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे केली आहे.

(म्हणे) ‘कला अकादमीचे ‘शुद्धीकरण’, ही एक अंधश्रद्धा !’ – काँग्रेस

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजी येथील कला अकादमीच्या ज्या जागेत अंत्यदर्शनासाठी ठेवले होते, त्या जागेचे कला अकादमीच्या काही कर्मचार्‍यांनी धार्मिक विधीद्वारे शुद्धीकरण केल्यानेे हा चर्चेचा विषय बनला आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे वृंदावन, वाराणसी आणि उत्तराखंड येथील सुलभ इंटरनॅशनल फाऊंडेशनकडून आयोजित होळीचा कार्यक्रम रहित

वृंदावनच्या ठाकुर गोपीनाथ मंदिरात सुलभा इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्याकडून होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आले होते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गोमंतकियांनी दिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, अंत्ययात्रेचे राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून झाले थेट प्रक्षेपण, मिरामार येथील समुद्रकिनार्‍यावर झाले अंत्यविधी 

(म्हणे) ‘मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी !’ 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन हा राफेल प्रकरणाचा पहिला बळी आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. या वेळी आव्हाड यांनी ‘गेलेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये; पण हे वास्तव आहे’

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्च या दिवशी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही मासांपासून ते स्वादुपिंड कर्करोगाने आजारी होते.

‘पीएसी’ अहवालाला अनुसरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या विरोधात काँग्रेस ‘हक्कभंग’ प्रस्ताव आणणार

अनधिकृत खाण व्यवसायाच्या विषयावर ‘पब्लिक अकाऊंट्स कमिटी’ (पीएसी) अहवालाच्या माध्यमातून विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी वर्ष २०११मध्ये अनधिकृत खाण व्यवसायाला अनुसरून …..

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध डावलून गोवा सरकारकडून सनबर्न क्लासिकला अनुमती

गोवा सरकारचा पुन्हा एकदा संस्कृतीद्रोह ! कॅसिनो, गोहत्याबंदी, मद्यबंदी आदी सर्व स्तरांवर सरकार जनतेच्या हिताचा विचार न करता केवळ महसुलाचा विचार करते. त्यामुळेच आज राज्याचे सर्व स्तरांवर अधःपतन होत आहे !

गोव्यात ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामावरून मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मुलाला उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामावरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मुलगा अभिजात पर्रीकर यांना १२ फेब्रुवारी या दिवशी नोटीस पाठवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF