मालमत्ता कराविषयी विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करत आहे ! – परेश ठाकूर, सभागृह नेते

वास्तविक मालमत्ता कर आकारणी हा विषय प्रशासनाच्या अखत्यारीतील असतांना विरोधक नाहक सत्ताधार्‍यांची अपर्कीती करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत….

कोरोना नियमांचे उल्लंघन आणि सभागृहाचा अवमान केल्याच्या प्रकरणी पनवेल महापालिकेतील १५ नगरसेवकांचे निलंबन !

५ एप्रिल या दिवशी महासभा ‘ऑनलाईन’ चालू असतांना हे नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात गेले. यामध्ये १४ नगरेसवक हे महाविकास आघाडीचे आणि १ नगरसेवेक भाजपचा आहे.

आघाडीतील घटक असलेल्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.    

मिठी नदीमध्ये संगणक, सीपीयू, २ नंबर प्लेट, २ डी.व्ही.आर्., प्रिंटर, तसेच अन्य महत्त्वाचे पुरावे सापडले

वाझेंच्या घरातून ६२ काडतुसे जप्त करण्यात आली; मात्र ती घरी कशी आली ? याचे उत्तर वाझे यांच्याकडून मिळाले नाही. तसेच सरकारी कोट्यातून वाझे यांना देण्यात आलेल्या ३० पैकी २५ काडतुसे गहाळ आहेत. याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही – एन्आयए

वाझे यांच्या चौकशीतून काय बाहेर येईल ? या भीतीने महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस यांची अपकीर्ती आम्ही केली नाही. ज्यांनी वाझे यांची नियमबाह्य नियुक्ती केली, तेच पोलिसांची अपकीर्ती करत आहेत.

संजय राठोड यांच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही ? याविषयी २ आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा ! – मुंबई उच्च न्यायालय

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले; मात्र या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणार्‍यांची हयगय केली जाणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुंबई पोलिसांची स्थानांतरे कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आलेली  नाहीत. पोलिसांच्या स्थानांतराविषयी करण्यात आलेल्या आरोपांविषयी पूर्ण माहिती घेऊनच मी बोलीन. पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणार्‍यांची हयगय केली जाणार नाही

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘जे आरोप तुम्ही केले आहेत ते गंभीर आहेत यात शंका नाही; मात्र हे प्रकरण एवढे गंभीर होते, तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाहीत ?’ – सर्वोच्च न्यायालय

राज्याच्या अपयशाविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकारला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

 मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, महाराष्ट्र पोलिसांचे जगभर नाव असतांना दुसर्‍या यंत्रणेकडून अन्वेषण करा, असे म्हणायचे म्हणजे महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास दाखवल्यासारखेच आहे.