सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी कोरोनाच्या पडताळणीचा अहवाल तात्काळ देणे, छोट्या घटकांना आर्थिक सहकार्य देणे यांसह अन्य गोष्टींचे नियोजन करावे ! – आमदार सुधीर गाडगीळ

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.

अनिल देशमुख यांच्या स्वीय साहाय्यकांचा केंद्रीय अन्वेषण विभागाने जबाब नोंदवला !

मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटके प्रकरण यांत अटक करण्यात आलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अन्वेषणात कुंदन अन् पालांडे यांनी नावे आली होती. यावरून त्यांचा जबाब केंद्रीय अन्वेषण विभागाने नोंदवला आहे.

परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा गृहविभागाचा आदेश !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप आणि राज्यशासनाला न्यायालयात प्रतिवादी करणे, हे अखिल भारतीय सेवा (वर्तणूक) नियमांचा भंग आहे का ? याविषयी परमबीर सिंह यांच्या प्राथमिक अन्वेषणाचा गृहविभागाचा आदेश !

… मग राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कोरोनावरील लस कशी दिली जाते ? – मुंबई उच्च न्यायालय

‘देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस घेतली, मग महाराष्ट्रातील राजकीय नेते काही वेगळे नाहीत की, त्यांना घरी जाऊन लस देण्याची आवश्यकता भासावी.’

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

वाझे प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री 

या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का ?, याविषयी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

“राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या.”

स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र गेल्या वर्षापासून पहात आहे ! – जयंत पाटील, जलसंपदामंत्री

महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला अपकीर्त केले जात आहे, असे ट्विट राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली !

आरोप करणारा तुमचा (अनिल देशमुख) शत्रू नव्हता; पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा उजवा हातच (परमबीर सिंह) होता. त्यामुळे तुम्हा दोघांची चौकशी झालीच पाहिजे.

पुणे येथील दळणवळण बंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या निर्णयाचा येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.