आमदार निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ ! – अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘दळणवळण बंदी’त शिथिलता आणल्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याची ३३ टक्के महसुलात वाढ झाली आहे, तसेच ‘जी.एस्.टी.’च्या परताव्यात ही वाढ झाली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीस राज्यपालांनी अनुमती नाकारली !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात पालट करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी दिनांक निश्चित करता येत नाही, अशी भूमिका कोश्यारी यांनी घेतली आहे. राज्यपालांनी दिनांक निश्चित केल्याविना निवडणूक होऊ शकत नाही.

उष्माघाताच्या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

यापुढील काळात उष्माघात टाळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ?’, असे औचित्याचे सूत्र उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना आरोग्यमंत्री बोलत होते.

फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्‍यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री

पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !

‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्याविषयी भाजपच्या ९२ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडी शासनाच्या कार्यकाळात ‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ होईल !  – अंबादास दानवे, शिवसेना

संभाजीनगर येथील विमानतळाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र अद्याप हे नामकरण करण्यात आलेले नाही.

खेळात प्राविण्यप्राप्त व्यक्तीची क्रीडाशिक्षकपदी नियुक्ती करण्याचे नवीन धोरण आणणार ! – कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

जागतिक, राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती ! भाजपचे भाई गिरकर यांच्या लक्षवेधीला दिलेले उत्तर !

राज्याच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी ! – शंभुराज देसाई, गृहराज्यमंत्री

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ची गोपनीय माहिती बाहेर जाणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. फडणवीस यांना ही माहिती कशी मिळाली, याची माहिती घेण्यासाठीच त्यांची चौकशी करण्यात आली.

‘दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?’ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्‍यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्‍या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?

विकासकामांसाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री कार्यक्रमाची कार्यवाही करून मानवी जीवनमान उंचविण्याकरता प्रयत्न केले जातील.