एस्.टी. महामंडळात ५ सहस्र ३०० नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक गाड्या येणार !
गाड्या वातानुकूलित असल्या, तरी गाड्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करण्यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
गाड्या वातानुकूलित असल्या, तरी गाड्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करण्यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नात दिली. सदस्य राजेश राठोड यांनी हा प्रश्न विचारला होता.
मुंबई-नागपूरला जोडणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर या दिवशी झाले होते. त्यानंतर १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी ‘नॉन एसी शयनयान’ बससेवा चालू करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने दत्तजयंतीच्या निमित्ताने भाविकांसाठी अधिकच्या ५५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात नृसिंहवाडी-सांगली, नृसिंहवाडी-हुपरी, नृसिंहवाडी-कोल्हापूर, इचलकरंजी यांचा समावेश आहे.
अपव्यवहार करणार्या दोषी अधिकार्यांना नुसते निलंबित केल्यास त्यांच्या वृत्तीत काहीच पालट होणार नाही ! त्यामुळे अशा अधिकार्यांवर बडतर्फीची कारवाई करून कायमचे घरी पाठवले पाहिजे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद चालू असल्याने नगरहून गाणगापूरकडे जाणारी १ बस कर्नाटकच्या सीमेवर थांबवण्यात आली होती. या बसमध्ये ४८ प्रवासी होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.
नवीन दर आकारणीप्रमाणे प्रत्यक्ष चालवण्यात आलेल्या किलोमीटरसाठी ५५ रुपये बसभाडे आणि खोळंबा आकार १० रुपये द्यावा लागणार आहे. यामुळे सौंदत्ती भाविकांची यात्रा सुखकर होणार आहे.
खासगी वाहनचालकांवर कुणाचा अंकुश कसा नाही ? त्यांनाही दरवाढ मागे घेण्यास लावायला हवे, असेच जनतेला वाटते !
प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या गारगोटी, इचलकरंजी, तसेच गडहिंग्लज अशा प्रत्येक आगारासाठी २० संख्येने मिळाल्या आहेत.
महामंडळाने नागपूर येथील सर्व आगारांमध्ये ‘डिस्प्ले बोर्ड’वर बसगाड्यांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन’ केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतो.