आजपासून होणार्‍या बेमुदत ‘शिर्डी बंद’ला २५ गावांचा पाठिंबा

श्री साईबाबांचे जन्मस्थळ शिर्डी कि पाथरी, हा वाद चालू असतांना परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विकास आराखड्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने शिर्डीकर संतप्त झाले आहेत. पाथरी गावाला श्री साईबाबांच्या जन्मस्थळाचा दर्जा न देण्यासाठी ग्रामस्थांनी १९ जानेवारीपासून बेमुदत ‘शिर्डी बंद’ची घोषणा केली आहे.