वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली.

प्रयागराज येथे प्रजासत्ताकदिनी क्रांतीकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ‘अक्षयवट आणि बडे हनुमान’ या मार्गावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष’ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य हिंदु समाजासाठी प्रेरणादायी ! – पालकमंत्री जयकुमार रावल

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रदर्शन आणि मूर्तीविसर्जन मोहिमेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास वाढता प्रतिसाद !

गणेशोत्सवाचे औचित्य साधून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठिकठिकाणी लावण्यात येत असलेल्या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास भाविकांकडून वाढता प्रतिसाद  मिळाला.

सनातन संस्था रत्नागिरीच्या वतीने क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त देवरुख येथील शाळांमध्ये क्रांतीगाथा प्रदर्शन !

क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सनातन संस्था रत्नागिरीच्या वतीने देवरुख येथील शाळांमध्ये क्रांतीगाथा प्रदर्शन लावण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्याने, स्वरक्षण प्रात्यक्षिके आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन !

येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्याने, फलक प्रदर्शन, स्वरक्षण प्रात्यक्षिके यांसारखे विविध उपक्रम घेण्यात आले.

नागपूर येथेही व्यापक स्तरावर जनजागृती !

शहरात २२ शाळांत ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयी व्याख्याने घेण्यात आली, तर २ शाळांमध्ये क्रांतीकारकांची माहिती देणारे ‘क्रांतीगाथा’ हे फलक प्रदर्शन लावण्यात आले.

प्रेरणादायी क्रांतीगाथा प्रदर्शनातून राष्ट्रप्रेमी पिढी सिद्ध होईल ! – मुख्याध्यापक अनिल जाधव

क्रांतीकारकांनी ब्रिटिशांशी झुंज दिली. क्रांतीकारकांच्या बलीदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मोजक्याच क्रांतीकारकांची आपण पुण्यतिथी वा जयंती साजरी करतो; परंतु अनेक क्रांतीकारकांची माहिती या प्रदर्शनातून आपल्याला मिळणार आहे. अनेक क्रांतीकारक हसत हसत देशासाठी फाशी गेले.

तळोजा येथे क्रांतीकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाच्या माध्यमातून जागृती !

तळोजा येथील कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालयात सनातन संस्था चेन्नई या न्यासाच्या वतीने राष्ट्रभक्ती जागृत करणारे सचित्र क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन १६ जुलै या दिवशी लावण्यात आले. या प्रदर्शनाचा लाभ विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांनी घेतला.

विक्रोळी (मुंबई) येथे श्री शिवस्वराज्य संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित किल्ले प्रदर्शनाच्या ठिकाणी क्रांतीकारकांचे प्रदर्शन !

प्रदर्शनाच्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीनिर्मित क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या कार्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF