शिवराज नाईकवाडे यांच्याकडील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा सचिवपदाचा कार्यभार काढला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडील सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढून घेतला आहे. सध्या हा कार्यभार राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

श्रीमहालक्ष्मीदेवीचे नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मूर्तीच्या संदर्भात शासनाला सविस्तर अहवाल पाठवण्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांचे सुतोवाच !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात प्रसारमाध्‍यमांना छायाचित्रक घेऊन येण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांकडून बंदी !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीच्‍या संदर्भातील वस्‍तूस्‍थिती प्रशासनाने जनतेसमोर आणावी, अशीच देवीभक्‍तांची मागणी आहे !

मूर्तीवरील नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाची मागणी

हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या मुखावरील संवर्धनाचा लेप काढला !

श्रीपूजक माधव मुनीश्‍वर यांचे न्यायालयात सत्यप्रतिज्ञापत्रातून गंभीर आरोप

केंद्रीय पुरातत्‍व विभागाच्‍या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीची पहाणी !

कोल्‍हापूर येथील साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीवर राज्‍य पुरातत्‍व विभागाने वज्रलेप केला असून मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि मुखमंडल या ठिकाणी पालट झाल्‍याचे दिसून येत आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

मुळे मूर्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी १४ मार्चला सकाळी मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.

व्यापारी, नागरिक यांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले.

‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

हिंदूंच्‍या धार्मिक विधींना विरोध करण्‍यासाठी डाव्‍यांचा थयथयाट !

यज्ञ हे भारतीय संस्‍कृतीचे मूलभूत धार्मिक अंग आहे. यज्ञामागील विज्ञान आणि धर्मशास्‍त्र समजून न घेणार्‍यांची बौद्धिक दिवाळखोरीच यावरून लक्षात येते. यज्ञाला विरोध करणारे एकप्रकारे हिंदु धर्मालाच विरोध करत आहेत.