युक्रेनने रशियन सैन्यावर केली ‘शक्तीशाली आक्रमणे’ ! – युक्रेन
युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.
युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.
शिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ होऊन एक मास उलटला असून यासंदर्भात एक तातडीची बैठक घेण्यासाठी ‘नाटो’चे (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चे) सर्व सदस्य देश बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे शिखर संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत.
अमेरिका रशियावर अत्यधिक तीव्रतेचे निर्बंध लादत असल्याने रशिया अमेरिकेवर ‘सायबर आक्रमणे’ही करू शकतो, असेही बायडेन म्हणाले.
एखाद्याला आधी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आणि नंतर प्रत्यक्ष युद्ध चालू झाल्यावर त्याला साहाय्य न करता मरण्यासाठी सोडून देऊन त्याचा विश्वासघात करायचा, अशी कृती भारताने कधी केली नाही, हे बायडेन यांना भारताने सुनावले पाहिजे !
युद्धामुळे रशिया स्वतःची प्रगती नष्ट करत आहे. त्याला याची फार मोठे आर्थिक मूल्यदेखील मोजावे लागत आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.
पुतिन यांची पाश्चात्त्य देशांना चेतावणी !
रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.
ट्रम्प पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोटाळा झाला नसता, तर हे सगळे घडलेच नसते आणि मी जर पुन्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडले नसते.
बायडेन पुढे म्हणाले की, आता जगाकडे दोन पर्याय आहेत. एक तर तिसरे महायुद्ध चालू करा आणि थेट रशियाच्या सैन्याशी आमने-सामने लढा किंवा जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्याला त्याची किंमत चुकवायला लावा.
बायडेन यांनी झेलेंस्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी साहाय्य देऊ केले; मात्र झेलेंस्की यांनी रशियन सैनिकांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच राजधानी कीवध्येच रहाणार असल्याचे ठामपणे सांगत अमेरिकेचे साहाय्य नाकरले.