राज्‍यातील मध्‍यवर्ती कारागृहात आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवणार !

मुंबई मध्‍यवर्ती कारागृह, तळोजा मध्‍यवर्ती कारागृह, येरवडा मध्‍यवर्ती कारागृह आणि ठाणे मध्‍यवर्ती कारागृह या चार कारागृहांत सीसीटीव्‍ही कॅमेरे अन् पडताळणी यंत्रे (बॉडी स्‍कॅनर) बसवण्‍यात येणार आहेत.

प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यावरून १७ वर्षांचा कारावास भोगणार्‍या तरुणाची पुतिन यांनी केली सुटका !

अमेरिकेत प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुटका केली. या तरुणाने युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुतिन यांनी त्याची सुटका केली आहे.

न्यायालयाच्या आदेशाने आतंकवादी जयेश पुजारी याची पुन्हा बेळगाव कारागृहात पाठवणी !

जयेश हा लष्‍कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ‘पी.एफ्.आय.’सह अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे.

अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या ९७ सहस्र भारतियांना एका वर्षात अटक केल्याचा दावा !

अशी आकडेवारी आणि त्यामागील कारण सांगून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव नसेल कशावरून ?

कारागृहात बंदीवान उघडपणे धूम्रपान करतात ! – राज कुंद्रा

भारतातील कारागृहांच्या दुरवस्थेविषयी बरीच माहिती समोर आली आहे; मात्र त्यात सुधारणा करण्याविषयी सरकारी यंत्रणांकडून कृती केली जात नाही, हे संतापजनक होय !

विविध उपक्रम राबवून आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची सुविधा देऊनही बंदीवानांमध्ये सुधारणा अल्प ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कोलवाळ कारागृहात चिकन वाढण्यासारख्या क्षुल्लक कारणामुळे हल्लीच बंदीवानांमध्ये हाणामारी झाली होती. यात ३ बंदीवान घायाळ झाले होते.

अमली पदार्थ तस्‍करीप्रकरणी पोलीस हवालदार अटकेत !

पोलिसांनी तस्‍करी करणे म्‍हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्‍याचा’ प्रकार !

खटले रखडत असल्याने आरोपींना वर्षानुवर्षे कारागृहात रहावे लागते ! – न्यायमूर्ती भारती डांगरे

खटले इतके का रखडतात ? यामागील कारणांचा अभ्यास करून न्याययंत्रणेने लवकरात लवकर न्यायदान करण्याचा प्रयत्न करावा, तसेच सरकारनेही या समस्येचे निराकरण करण्यासाठी लक्ष घालावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

येरवडा कारागृह प्रशासनाला बंदीवानाने २६ लाखांहून अधिक रुपयांना फसवले !

येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानाने कारागृहातील अधिकार्‍याची खोटी स्वाक्षरी करून ‘मनीऑर्डर’ पुस्तिकेमध्ये फेरफार करून २६ लाख ६९ सहस्र ९११ रुपयांची फेरफार करून फसवणूक केली आहे.

कारागृहात जाऊन बंदीवानांशी वार्तालाप करण्याच्या चर्चच्या मोहिमेला अनुमती देऊ नये ! – हिंदु रक्षा महाआघाडी

‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.