भारताची चंद्रझेप यशस्वी !

भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची महत्त्वपूर्ण योजना असणार्‍या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यामुळे केवळ भारताच नव्हे, तर जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला !

‘इस्रो’च्या भरती परीक्षेत ‘कॉपी’ करतांना पकडल्या गेलेल्या दोन परिक्षार्थींना हरियाणातून अटक !

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, त्याला अन्य एका व्यक्तीने या प्रकरणाची दूरभाषवरून सूचना केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

‘चंद्रयान-३’चा ‘लँडर विक्रम’ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर !

येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.

‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने अल्प केला वेग !

भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.

‘चंद्रयान-३’चा ‘अवतरक’ (लँडर) यानापासून यशस्वीपणे विभक्त !

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १७ ऑगस्टला दुपारी ‘चंद्रयान-३’च्या ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून विक्रम नावाचा ‘अवतरका’ला अर्थात् ‘लँडर’ला यशस्वीपणे विभक्त केले.

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

२३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे.

भारताच्या चंद्रयान ३ बरोबर स्पर्धा करण्यासाठी रशिया चंद्रावर ११ ऑगस्टला सोडणार ‘लुना २५’ यान !

अवघ्या १२ दिवसांत भारताला मागे टाकत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून जागतिक विक्रम बनवण्याचा रशियाचा प्रयत्न !

‘चंद्रयान ३’ आता चंद्राच्या अधिक जवळून मारत आहे घिरट्या !

१४ ऑगस्टला ते चंद्राच्या अधिक जवळ जाणार आहे, अशी माहिती ‘इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. ‘चंद्रयान ३’ हे २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रावर यशस्वीरित्या उतरेल, अशी इस्रोच्या वैज्ञानिकांसह भारतवासियांना आशा आहे.

‘चंद्रयान-३’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश !

चंद्रयानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. आता हे यान चंद्रावर उतरण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. या यानाने १ ऑगस्टला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने प्रवास चालू केला होता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) एकाच वेळी केले सिंगापूरच्या ७ उपग्रहांचे प्रक्षेपण !

पाठवलेल्या ७ उपग्रहांपैकी ‘डीएस्-एस्एआर्’ हा सर्वांत महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकारच्या विविध यंत्रणांच्या आवश्यकता पूर्ण करणार आहे.