पुरंदरे तालुक्यात जलशिवार योजनेत २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा विधान परिषदेत विरोधकांचा आरोप

राज्यातील जलशिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पुरंदरे तालुक्यात जलशिवार योजनेत २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी १ जुलै या दिवशी विधान परिषदेत केला.

सिंचन घोटाळा

विदर्भासारख्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन योजनेत २० सहस्र कोटी रुपयांचा महाघोटाळा करून घोटाळेबाज काँग्रेस शासनाने शेतकर्‍यांना लुटले. ३८ सिंचन प्रकल्पांची मूळ ६ सहस्र ६७२ कोटी रुपये असलेली किंमत वाढवून ती २६ सहस्र ७२२ कोटी रुपये करण्यात आली.

प्रशासकीय योजनांतील निष्फळपणा

‘भारतात एकीकडे भूकबळी जात असतांना दुसरीकडे वर्ष २००५ ते २०१३ पर्यंत एकूण १ लक्ष ९४ सहस्र मेट्रिक टन एवढे कोट्यवधी रुपयांचे धान्य वाया गेल्याची माहिती ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा यांनी केलेल्या अर्जानुसार प्राप्त झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आतातरी सुटणार का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील अरुणा धरण, कणकवली तालुक्यातील नरडवे धरण आणि दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण येथील धरणग्रस्तांच्या आजही अनेक समस्या आहेत. यासाठी धरणग्रस्तांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली.

वैभववाडीतील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वर्ष २००५ मध्ये ५४ कोटींचा खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता १ सहस्र ६०० कोटी रुपयांवर आला आहे.

पाककडून होणाऱ्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘सिंधू जल करार’ मोडू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चेतावणी

गेल्या ५ वर्षांत पाकने अनेक आतंकवादी आक्रमणे करूनही भाजपने हा करार का मोडला नाही ? आता करार मोडण्यासाठी सरकार कशाची वाट पहात आहे ? अशा चेतावणीमुळे ‘पाक आतंकवादी कारवाया थांबवील’, अशी अपेक्षा कधीतरी करता येईल का ?

सिंचन घोटाळा प्रकरणाचा निकाल कधीही येऊ शकतो ! – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

अजित पवार यांच्याविषयीचे सिंचन घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. त्याचा कधीही निकाल येऊ शकतो, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. येथे १ एप्रिलला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विपुलतेच्या खोर्‍यातून तुटीच्या आणि अति तुटीच्या खोर्‍यात-उपखोर्‍यांत पाणी वळवले जाणार ! – जलसंपदामंत्री गिरीश महाजन

राज्यात गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी आदी प्रमुख नद्यांच्या खोर्‍यांचा अभ्यास करून हा आराखडा सिद्ध केला आहे. त्यानुसार आता ८ सहस्र घनमीटर प्रति हेक्टरपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असलेल्या विपुलतेच्या खोर्‍यातून तुटीच्या आणि अति तुटीच्या……

सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा सिंचन योजनेद्वारे कायापालट ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना शेतीसाठी उघड्या कालव्याद्वारे पाणी दिल्यास ते वाया जाते. त्यामुळे आम्ही बंद पाण्याच्या वाहिन्यांद्वारे थेट शेतकर्‍यांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ताकारी योजनेच्या अंतर्गत १३ सहस्र हेक्टर, म्हैशाळला ४२ सहस्र हेक्टर, तर टेंभूला ९४ सहस्र हेक्टर भूमीला हे पाणी मिळणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF