श्रीलंकेत उभारलेल्या फलकांवर तमिळची जागा घेत आहे चिनी भाषा !

‘चीनला दिली ओसरी, चीन हातपाय पसरी’, असेच यातून स्पष्ट होते ! आज तमिळ भाषा हटवणारा चीन उद्या संपूर्ण श्रीलंकेला स्वतःच्या नियंत्रणात घेतल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कन्नड भाषेविषयी अपशब्द वापरणार्‍या गूगलकडून क्षमायाचना !

गूगल ऑनलाइन ‘सर्च इंजिन’ने कन्नड भाषेला ‘भारतातील सर्वांत घाणेरडी भाषा’ असे म्हटले होते. कर्नाटक सरकारकडून विरोध झाल्यानंतर गूगलने भारतियांची क्षमा मागितली आहे.

‘ग्लोबल टिचर पुरस्कार’ प्राप्तकर्ते पहिले भारतीय शिक्षक डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती !

जगभरातील १२ व्यक्तींची या समितीवर सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बार्शी येथील डिसलेगुरुजी यांचा समावेश आहे.

इस्रायलमध्ये नेतन्याहू यांचे सरकार जाऊन नेफ्टाली बेनेट होणार नवीन पंतप्रधान

केवळ ७ खासदारांचे समर्थन असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनणार आहेत. नेफ्टाली हे जरी कट्टर राष्ट्रवादी नसले, तरी त्यांचा यामिना पक्ष हा पॅलेस्टाईनचा कट्टर विरोधी असल्याचे मानले जाते.

पोप फ्रान्सिस यांनी क्षमायाचना करावी ! – कॅनडाच्या मंत्र्यांची मागणी

स्थानिक आदिवासी मुले येथे शाळेत शिकत असतांना त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

चीनमध्ये आता २ नाही, तर ३ मुले जन्माला घालता येणार !

चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले आहे. भविष्याचा विचार करता चीनने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या उत्पत्तीसाठी वुहानमधील नव्हे, तुमच्या प्रयोगशाळेची चौकशी करा ! – चीनचे अमेरिकेला आव्हान

चीनने अमेरिकेला आव्हान देत बसण्यापेक्षा जागतिक मत त्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे. तसेच कोरोनाच्या निर्मितीविषयी जे सत्य आहे, ते जगाला सांगायला हवे !

आवश्यकता वाटल्यास अमेरिकेशीही संघर्ष करू ! – इस्रायल

वर्ष २०१५ मध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला अणू करार पुन्हा एकदा लागू करण्यासाठीच्या वाटाघाटी चालू आहेत. इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

इराणची सर्वांत मोठी युद्धनौका आग लागून समुद्रात बुडाली !

ही युद्धनौका इराणने ब्रिटनकडून वर्ष १९८४ मध्ये विकत घेतली होती. ब्रिटनने ही युद्धनौका वर्ष १९७७ मध्ये बनवली होती.

पाकिस्तानने चीनच्या साहाय्याने बनवली कोरोना प्रतिबंधात्मक लस !

पाकिस्तानचे विशेष आरोग्य साहाय्यक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले की, लस बनवण्यासाठी आम्हाला चीनने कच्चा माल पुरवला. तरीदेखील हे काम सोपे नव्हते. लवकरच ही लस मोठ्या प्रमाणात सिद्ध केली जाईल.