सीमाप्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे ! – चीन

असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.

रशियाकडून विशेष विशेषाधिकार प्राप्त, रणनीतीचा सहकारी दर्जा प्राप्त करणारा एकमेव देश भारत !

हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले !

माझ्या भ्रमणभाषची हेरगिरी केली जाते ! – राहुल गांधी यांचा केंब्रिज विश्‍वविद्यालयात दावा

भारतीय राज्यघटनेत भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा आवश्यक आहे. आता हा संवादच संकटात सापडला आहे. विरोधी पक्षांचे नेते काही सूत्रांवर चर्चा करत होते. त्यांना कारागृहात डांबले. असे ३-४ वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते.

(म्हणे) शेजारील देशाला होत असलेल्या शस्त्रपुरठ्यामुळे दक्षिण आशियात अस्थिरता ! – पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार

गेली अनेक दशके अमेरिकेकडून पाकला होत असलेल्या शस्त्रपुरवठ्यामुळे ही अस्थिरता निर्माण होत नव्हती का ?

भारत जी-२०चा अध्यक्ष म्हणून आशादायक प्रारंभ करत आहे ! – अमेरिका  

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस पत्रकार परिषदेत म्हणाले की, आजपर्यंत भारताने जी-२० चे नेतृत्व केले आहे, त्यासाठी आम्ही आमच्या भारतीय भागीदारांचे आभारी आहोत.

श्रीमंत देशांमुळे होणार्‍या जागतिक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका गरीब देशांना बसतो ! – पंतप्रधान मोदी

जगातील महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी निर्माण केलेल्या संस्था मोठ्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अनेक वर्षांच्या प्रगतीनंतर आज आपण शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये मागे जाण्याचा धोका पत्करला आहे.

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका

‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) ही तालिबानी आतंकवादी संघटना पाकचे २ तुकडे करण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती अमेरिकेने दिली आहे.  

पाकिस्तानमध्ये  १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे ! – भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली

पाकिस्तानमध्ये कमीतकमी १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतेही आर्थिक साहाय्य दिले जाऊ नये, असे विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित केलेल्या निक्की हेली यांनी केले आहे.

मुलांनी हॉलिवूडचा चित्रपट पाहिल्यास त्यांना ५ वर्षांची, तर पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा !

हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे मुलांवर वाईट परिणाम होत असल्याने हे चित्रपट पहाणार्‍या मुलांना ५ वर्षांची, तर त्यांच्या पालकांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने केली.

चालू वर्षीच तिसरे महायुद्ध होईल ! – भविष्यवेत्ते क्रेग हैमिल्टन पार्कर

तिसरे महायुद्ध हे रशिया-युक्रेन नव्हे, तर तैवानमुळे होईल. तैवानमध्ये एक भयानक विमान दुर्घटना होईल आणि तेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण बनेल. या युद्धाचे परिणाम गंभीर असतील. चीन अनेक भागांमध्ये विखुरला जाईल.