तुम्ही देशाचे वाटोळे केले ! – जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या नागरिकाने सुनावले

या प्रसंगाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून ‘आयात’ ! – नदीम जान, आरोग्य मंत्री, पाकिस्तान

असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !

भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद होणार नाही : उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

भारतातील दूतावास आणि वाणिज्य दूतावास बंद केल्याची अफवा अफगाणिस्तानचे अन्य एक राजदूत मामुंदझाई यांनी पसरवली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्याची विनंतीही मुख्य राजदूतांनी परराष्ट्र मंत्रालयाला केली.

कॅनडामध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात मुंबईच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ऑक्टोबरच्या शेवटी गगनयान मोहिमेची चाचणी

या चाचणीविषयी इस्रोचे शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो इनर्शिअल सिस्टम्स युनिट’चे संचालक पद्मा कुमार म्हणाले की, क्रू एस्केप सिस्टम अंतराळवीरांना रॉकेटपासून दूर नेईल. या प्रणालीच्या चाचणीसाठी चाचणी वाहन सिद्ध करण्यात आले आहे.

इस्रायलच्या ७ शहरांवर ‘हमास’ने डागले ५ सहस्र रॉकेट !

प्रत्युरादाखल इस्रायलच्या वायूदलाकडूनही पॅलेस्टाईनवर आक्रमण

परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालीनवाला बागेतील नरसंहराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.

कॅनडाने भारतातील त्याच्या ४१ अधिकार्‍यांना हटवले

भारत आणि कॅनडा यांच्यात खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येच्या प्रकरणात भारतावर आरोप करण्यात आल्यापासून वाद निर्माण झाला आहे.

सीरियामध्ये सैन्य अकादमीवर झालेल्या आक्रमणात १०० हून अधिक लोक ठार  

सीरियाच्या हुम्स शहरामध्ये आतंकवाद्यांनी सैन्य अकादमीवर ड्रोनद्वारे केलेल्या आक्रमणात अनुमाने १०० लोक ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले.