सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

..तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्व सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावल्यास कुणाला अनुमती द्यावी, याविषयी अध्यक्षांपुढे प्रश्न निर्माण होतो. बोलायला दिले नाही, तर सदस्य गोंधळ घालतात.

तिवरे धरण क्षेत्रातील ३० कुटुंबियांचे पुनर्वसन न होण्यामागील अडचणी दूर करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिवरे धरणाचा विषय गंभीर आहे. आम्हाला मोठ्या धरणांची आवश्यकता नसून छोटे-छोटे पाझर तलाव व्हावेत, अशी आमची मागणी आहे. तिवरे धरण फुटून चार वर्षे लोटली, तरी धरण नव्याने बांधण्याला संमती मिळालेली नाही.

‘इंडिया’ नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही ! – पंतप्रधान

आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.

(म्हणे) ‘संरक्षणाचा सौदा करणार्‍यांसाठी देश पहिला कि वासना ?’ – असदुद्दीन ओवैसी

भारताच्या संरक्षणाला सुरुंग लावणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार कटीबद्धच आहे ! मुसलमानांसाठी देश पहिला आहे कि नाही ? यावर ओवैसी पळपुटी भूमिका घेतात, हे मात्र खरे !

(म्हणे) ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा !’-ए.एन्. शमसीर यांची गरळओक

भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. असे असतांना राज्यघटनेने दिलेल्या एका महत्त्वाच्या पदावर राहून हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अधिकार शमसीर यांना कुणी दिला ?

(म्हणे) ‘पाकने भीक मागणे बंद करावे !’ – पाकचे सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे निघाले आहे. त्यामुळे पाकच्या सैन्यप्रमुखांनी अशी कितीही वक्तव्ये केली, तरी तेथील परिस्थिती पालटणार नाही, हेही तितकेच खरे !

लडाख सीमेवर शांतता पुनर्स्थापित होईपर्यंत चीनशी ताणलेले संबंध सामान्य होऊ शकत नाहीत !

चीन आणि पाकिस्तान यांना शब्दांची भाषा समजत नाही , त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भारत असे करील, तेव्हाच या समस्या दूर होतील !

पालटणार्‍या राजकीय स्थितीमुळे विधीमंडळाच्या समित्या रखडल्या ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

विधीमंडळात दिलेली आश्वासनांची पूर्तता करणे, अहवालांचा अभ्यास करणे आदी काम समित्यांकडून केले जाते. नवीन सरकार स्थापन होऊन १ वर्ष झाले, तरी अद्याप या समित्यांची स्थापना करण्यात आलेली नाही.

५ सहस्र शेतकर्‍यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

विविध योजनांद्वारे शेतकर्‍यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.