लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

ही प्रकरणे वर्ष २००७ पासूनची आहेत. यांतील ४० पैकी ३३ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. आणखी ५ जणांवर लवकरच आरोपपत्र प्रविष्ट करण्यात येईल. अनधिकृत तुकड्यांना मान्यता देणे, चुकीचे शालार्थ ‘आयडी’ देणे आदी प्रकार या प्रकरणात झाले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे येथील अग्नीशमन दलाच्या कात्रज स्थानकातील कर्तव्यावरील अधिकारी सक्तीच्या रजेवर ! – मंत्री उदय सामंत

पुणे येथील अग्नीशमन दलाच्या कात्रज स्थानकातील कर्तव्यावरील अधिकारी यांची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी २६ जुलै या दिवशी विधान परिषदेत दिली.

‘बार्टी’च्या वतीने प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ देणार नाही ! – शंभूराज देसाई, मंत्री

प्रक्रियेमध्ये अनियमितता, सरकारची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करू, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर अध्यात्म आणि संस्कार यांची दिशा देणारे ठरेल ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्‍यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.

आमदार डॉ. राजन साळवी यांनी विधिमंडळात औचित्याच्या मुद्याद्वारे मांडली भूमिका

रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदल्या) झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७०० पदे रिक्त झाली असून अपूर्ण शिक्षकांच्या संख्येमुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खासगी जागेत वीजमीटर बसतांना वनविभागाच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता नाही ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

खासगी जागेवर घर बांधतांना त्या ठिकाणी वीजमीटर घेण्यासाठी वनविभागाच्या नाहरकत दाखल्याची आवश्यकता नाही. भूमी वनविभागाची नसेल, तर अनुमतीची आवश्यकता नाही.

(म्हणे) ‘मणीपूरमधील पीडित महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा !’-अमेरिका

भारतातील अंतर्गत प्रश्‍नांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी अमेरिका लव्ह जिहादमुळे भारतातील लक्षावधी हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यावर चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !

पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !

दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.