‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

देवस्थानच्या व्यवहारासंबंधी माहिती न देणार्‍या २ अधिकार्‍यांना गोवा माहिती आयोगाकडून दंड

एखादी खासगी संस्था सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली येत असेल, तर त्या संस्थेची माहिती ही सार्वजनिक ठरते. या तरतुदीनुसार मामलेदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांवर ही माहिती देणे बंधनकारक ठरते.

यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.

रस्‍त्‍याचे काम होत नसल्‍याने विटा (जिल्‍हा सांगली) येथे दांपत्‍याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्न !

संघर्ष करूनही रस्‍ता मिळत नसल्‍याने विटा (जिल्‍हा सांगली) येथे प्रशांत आणि स्‍वाती कांबळे या दांपत्‍याने ‘फेसबुक लाईव्‍ह’ करत आत्‍महत्‍येचा प्रयत्न केल्‍याची घटना घडली.

पंतप्रधान मोदी यांच्‍या पुणे दौर्‍याला युवक काँग्रेसचा विरोध !

पंतप्रधान मोदी यांच्‍या दौर्‍याचा विरोधकांनी अनेक माध्‍यमांतून निषेध व्‍यक्‍त केला आहे. युवक काँग्रेसच्‍या वतीने पुण्‍यातील परिसरामध्‍ये पोस्‍टर्स (फलक) लावण्‍यात आली आहेत.

दगडूशेठ बाप्पाचे दर्शन ते मेट्रोचे लोकार्पण, असा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा !

पंतप्रधान सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

यवतमाळ येथे महामार्गावर भीषण अपघात !

नागपूर – तुळजापूर राष्‍ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणार्‍या महामार्ग पोलिसांच्‍या वाहनाला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली.

कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कलमामध्ये ३ मासांत सुधारणा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सरकारी कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कायद्याचा वापर कर्मचार्‍यांकडून शस्त्र म्हणून केला जात आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केली जात असून हे कलम त्वरित रहित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.

कोल्हापूरमधील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या कामात कोट्यवधीचा घोटाळा करणारे अधिकारी निवृत्त !

या प्रकरणी दूधगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित केले जाईल, तसेच जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे एका मासाच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लाचखोर अधिकारी पुन्हा कार्यरत होतात, यासाठी कायद्यात पालट करण्याविषयी अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना ९ मासानंतर पुन्हा कार्यकारी पदावर नियुक्त केले जाते. त्याच पदावर येऊन ते पुन्हा अपहार करतात.