कोरोनाचा अहवाल दाखवणार्‍यांनाच १० ते १२ मार्च या कालावधीत कुंभमेळ्यात प्रवेश

कुंभला येणार्‍या भाविकांकडे कुंभमेळ्याची नोंदणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी नसणार्‍यांना रेल्वेस्थानक अथवा बसस्थानक यांच्या बाहेर सोडले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील टेकड्यांवरील अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष !

अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करून जनतेचे आयुष्य धोक्यात आणणार्‍या अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

आरोग्य साहाय्यिकेसमवेत संबंध ठेवल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी निलंबित !

वैद्यकीय अधिकार्‍याकडून झालेले कृत्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्यासारखेच आहे !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून रहित

न्यायाधीश अकील कुरेशी यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा ‘ठकबाजी गीता’ असा उल्लेख करणार्‍याच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित केला.

पुणे येथील पोलीस निरीक्षकासह तिघांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !

शाहीस्नानासाठीच्या अतीमहनीयांच्या पासची अनुमती रहित

वृंदावनमध्ये ‘कुंभ पूर्व वैष्णव बैठक -२०२१’च्या निमित्ताने ९ मार्च या दिवशी शाहीस्नान होणार आहे. ज्या अतीमहनीयांना यायचे असेल, तर त्यांना सामान्य नागरिक होऊन स्नान करावे लागेल.

यशस्वी समुद्री अभियंता बनण्यासाठी स्वभावदोष निर्मूलनाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास आणि मनाच्या सकारात्मकतेसाठी नामजप करणे आवश्यक ! – गिरीश पुजारी, मुख्य समुद्री अभियंता

मनाला स्वयंसूचना देऊन सक्षम बनवण्याचे प्रयत्न करत रहावे लागतात.–श्री. गिरीश पुजारी

मोर्ले येथे हत्तीच्या आक्रमणात युवक गंभीर घायाळ

मोर्ले येथील शेतकरी विश्‍वनाथ सुतार काजूच्या बागेत गेले होते. तेव्हा अचानक आलेल्या हत्तीने सुतार यांच्यावर आक्रमण करत त्यांना उचलून आपटले. यामध्ये सुतार गंभीर घायाळ झाले.

सरकारी कर्मचारी ऐकत नसतील, तर त्यांना बांबूचे फटके मारा ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा जनतेला सल्ला

हे म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार ! प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वठणीवर आणण्याचे दायित्व सरकारचे नाही का ? असे सल्ले देण्याऐवजी केंद्रीय मंत्र्यांनी प्रशासन लोकाभिमुख कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जनतेला त्रास झाल्यास खपवून घेणार नाही ! – आमदार वैभव नाईक

शासनस्तरावर प्रतिवर्षी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी केले जाणारे प्रयत्न किती तकलादू आहेत, हे लक्षात येते, तसेच प्रतिवर्षी शासकीय कार्यालयातून दिली जाणारी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयीची शपथ, हाही एक ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते !