हिंदु धर्माला धोका नाही ! – माहिती अधिकारातील प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर

जबलपुरे यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी माहिती अधिकार कायद्यांतर्गत हिंदु धर्माला धोका असल्याविषयीची माहिती मागितली होती. यावर गृह मंत्रालयाचे मुख्य माहिती अधिकारी (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस्. राणा यांनी वरील उत्तर दिले आहे.  

‘मान्यवर’ ब्रँडने (प्रसिद्ध आस्थापनाने) हिंदूंची क्षमा मागून विज्ञापन मागे घ्यावे ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. विवाह विधींतील ‘कन्यादान’ हा एक महत्त्वाचा धार्मिक विधी असून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे.

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर आणि श्राद्धादी विधी यांचे महत्त्व 

व्यक्ती मृत झाल्यानंतर काही घंट्यांनी शरिराच्या आत विघटनाची क्रिया चालू होते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. ही दुर्गंधी सुटण्याच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्या देहाचे दहन करतो, म्हणजे त्या स्थूलदेहाचा संपूर्ण नाश करतो. ज्या पंचमहाभुतांपासून या देहाची निर्मिती झाली, त्या पंचमहाभुतांना आपण तो देह परत देतो.

पितरपूजन आणि तर्पणविधी या विधींतून निर्माण झालेल्या चैतन्याचा विधी करणार्‍या संतांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी श्राद्धविधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर, सनातनचे दिवंगत साधक, तसेच सर्व साधकांचे पूर्वज यांना मुक्ती लाभावी, यासाठी सद्गुरु … Read more

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ (जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

हिंदुद्वेष्ट्यांचा वैचारिक आतंकवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ आयोजकांचे अभिनंदन !

नास्तिकवाद्यांच्या बुद्धीभेदाला बळी न पडता हिंदूंनी श्राद्धविधीचे महत्त्व जाणून ते करणे आवश्यक !

सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या कालावधीत काही बुद्धीजीवींकडून ‘श्राद्ध’ या विधीविषयी सामाजिक माध्यमांद्वारे अपप्रचार करण्यात येत आहे. त्यावर अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य काय आहे, ते येथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.

पितृपक्षात शास्त्रोक्त महालय श्राद्धविधी करण्याचे महत्त्व लक्षात घ्या आणि ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर शास्त्र विधानानुसार पुढीलप्रमाणे श्राद्धविधी करा !

‘भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१) या कालावधीत पितृपक्ष आहे. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात सर्वांनी महालय श्राद्ध करायला हवे.

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.