‘कन्यादान’च योग्य !
शास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यामधील धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावेत. त्यात कोणताही अतिरेक करू नये, ही अट आहे. धर्म (व्रत वैकल्ये, कुलाचार, धर्मकृत्ये), अर्थ (द्रव्य योग्य पद्धतीने कमावणे आणि विनियोग, बचत, अन्य तरतूद), काम (सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.