सिक्कीममधील ‘गणेश टोक’ या जागृत मंदिराचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दर्शन घेतले !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या मंदिरामध्ये श्री गणेशाच्या दर्शनाला गेल्या असता तेथील पुजार्‍यांना कळले की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प घेऊन आल्या आहेत. तेव्हा त्यांनी श्री गणेशाकडे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता ! – ऋषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती, बेळगाव

स्वातंत्र्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भ्रष्टाचार, तुष्टीकरण, धर्मांतर, गोहत्या, यांसह अनेक समस्यांनी भारत ग्रस्त आहे. या सर्वाला हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे.

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा समारोप !

पूर्वजांमुळे होणार्‍या अनेक विविध त्रासांसाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप उपयुक्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने कलियुगात किमान १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी समारोपीय सत्रात केले.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात विविध हिंदु संघटनांचे ध्येय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ असल्याचा पुनरुच्चार !

कोरोनाच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रथमच अधिवेशन घेण्यात आले. हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्राची स्थापना हेच त्यांचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले, हे अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले.

कोल्हापूर येथे होणार अखिल भारत हिंदु महासभेचे महाधिवेशन !

कोल्हापूर येथे तब्बल १४ वर्षांनंतर होणार्‍या या महाधिवेशनामुळे जिल्ह्यातील हिंदु महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ईश्वराची कृपा संपादन करून सहभागी होऊया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करायला हवी आणि समवेत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही ईश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी साधना करायला हवी.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयावरून सामाजिक माध्यमांतून धर्मांधांची दलितांवर टीका

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांत पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यावरून आता सामाजिक माध्यमांतून धर्मांधांकडून दलितांना शिवीगाळ करण्यात येत आहे.

राष्ट्र-धर्माच्या कार्याला साधना आणि आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !’

युद्धातूनी शिकावे !

‘बळी तो कान पिळी’, हाच जगाचा नियम आहे. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास पूर्वीचे राजे चक्रवर्ती होते आणि संपूर्ण पृथ्वीवर त्यांचे राज्य होते. इंग्रजांच्या काळात लचके तोडले गेले. एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान यांना धूळ चारायची असेल, तर भारताने स्वयंसिद्ध होणे अपरिहार्य ! अशाने भारताला गतवैभव मिळवणे शक्य होईल !