हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी भगवंताचे भक्त होणे आवश्यक ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !

सेक्युलर व्यवस्थेचा उपयोग हिंदूंवर अन्याय करण्यासाठी ! – सौ. रूपा महाडिक

भारतीय राज्यव्यवस्था केवळ अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्यरत असून सेक्युलर व्यवस्था ही एक खोटी म्हणजेच बनावट व्यवस्था बनली आहे. तिचा उपयोग फक्त हिंदूंवर अन्याय करण्यासाठी होत आहे !

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणार आहे ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

मेणवली (सातारा) येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मेणवली यांच्या संयुक्त विद्यमाने ही सभा आयोजित करण्यात आली होती.

कराड (जिल्हा सातारा) येथे ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन !

श्री दत्त चौकातील शिवतीर्थावर ‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने सामूहिक गुढीपूजन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ’ दिली.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करावा ! – श्री श्री १०८ महंत श्री योगेश्वर दास महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’ला बंगाल आणि झारखंड राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्या अंतर्गत बंगाल अन् झारखंड राज्यांमध्ये नुकत्याच विविध हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या, तसेच धर्मजागृतीही केली. या भेटींचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

सध्याच्या काळातील समाजाच्या सर्व प्रकारच्या दुर्दशेवर हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय ! – राममूर्ती अग्निहोत्री, ज्योतिष अभ्यासक, वृंदावन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मार्च २०२२ या दिवशी मथुरा येथे आयोजित करण्यात आलेले हिंदु राष्ट्र अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला मथुरेमध्ये कार्य करणाऱ्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक असे अनेक जण उपस्थित होते.

हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्र’रूपी गोवर्धन पर्वताला काठ्या लावून खारीचा वाटा उचलावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील अंबर सभागृहात आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. ३ एप्रिल या दिवशी झालेल्या या अधिवेशनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

देशातील अनेक समस्यांवर एकच उपाय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज देशाची वाताहत झाली आहे. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लोकसंख्येचा विस्फोट, गडकोट दुरवस्था अशा अनेक समस्या वाढत आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.