मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

कोकणातील लोककलेला राजाश्रय हवा !

शिंदे-फडणवीस सरकारने या लोककलांना राजाश्रय मिळवून दिला, तर खर्‍या अर्थाने लोककलावंतांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी – पत्रकार परिषदेतील मागणी

हिंदूविचारांचे उत्‍थान !

अपरिहार्यता ही आहे की, पृथ्‍वीवर केवळ मनुष्‍यच नाही, तर जीवसृष्‍टी टिकवायची असेल, तर बहुसंख्‍य माणसे सनातन विचारांनी जगणारी हवी; कारण अहिंसा हे हिंदु धर्माचे सर्वांत मोठे तत्त्व आहे.

पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहास तात्काळ निधी उपलब्ध करून देणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

नामसंकीर्तन सभागृहाचे काम निधीअभावी अपूर्ण असून, यास आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करण्यात येईल. येथे येणार्‍या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा असलेले सभागृह उपलब्ध होईल- सुधीर मुनगंटीवार.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेसळयुक्त पदार्थांच्या अभिषेकामुळे भेग !

कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० मासांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे, असे मंदिरातील पुजार्‍यांच्या लक्षात आले.

उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

द्रमुक सरकारकडून एका मंदिरात धार्मिक परिषदेच्या आयोजनावर निर्बंध !

तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! तमिळनाडूत द्रमुक सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी कारवाया वाढल्या आहेत. परिणामकारक हिंदूसंघटनाद्वारेच त्या रोखणे शक्य आहे !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.