मॉरिशस न्यायालयाचा निवाडा, भारताचा प्रत्यार्पण कायदा आणि केंद्र सरकारने घेतलेली कठोर भूमिका !
‘मुंबईतील शेख ईश्तियाक अहमद हा मॉरिशसमध्ये २ वेळा भंगार विकण्याच्या निमित्ताने गेला होता. तो तिसर्यांदा तेथे गेला असतांना त्याच्याकडे १५२.८ ग्रॅम हेरॉईन सापडले. त्याला मॉरिशस न्यायालयाने २६ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.