देशाचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यासाठी तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध आवश्यक !

आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध प्रयत्न केला आणि तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला, तर नक्कीच नागरिकांचे, देशाचे आरोग्य स्वस्थ अन् बलशाली होण्यास साहाय्य होईल हीच अपेक्षा !

रुग्णाला मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे नेतांना रुग्णवाहिका बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ

या घटनेमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा गंभीर स्थितीतील रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे शासनाने चांगल्या स्थितीतील रुग्णवाहिका रुग्णालयांना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान !

तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई केली गेली नाही. त्यामुळे याचिकाकर्तीने पुन्हा एकदा सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेऊन पोलिसांची निष्क्रियता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

एकाच खांद्यावर वजन किंवा पिशवी घेणे टाळावे !

शरिराच्या संरचनेत पालट झाल्यास त्याचा कटी (कंबर), गुडघा, टाच इत्यादी सांध्यांवर ताण येऊन त्यांचे दुखणे चालू होते. असे होऊ नये, यासाठी एकाच खांद्यावर वजन न घेता आलटून पालटून दोन्ही खांद्यावर थोडा थोडा वेळ वजन घ्यावे.’

पावसाळा चालू होण्यापूर्वी औषधी वनस्पतींच्या लागवडीची सिद्धता करा !

वनस्पतींचे औषधी उपयोग आणि लागवडीविषयी माहिती सनातनचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत दिली आहे. या ग्रंथांचा अभ्यास करावा.

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र आम्ही पालटणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे.

तीव्र उन्हामुळे येणार्‍या थकव्यावर सरबत उपयुक्त

‘उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे पुष्कळ घाम येतो. शरिरातील पाणी आणि क्षार न्यून झाल्याने थकवा येतो. अशा वेळी लिंबू सरबत किंवा अन्य कोणतेही सरबत प्यावे. याने पाणी आणि क्षार यांची पूर्तता होऊन लगेच तरतरी येऊन आराम वाटतो.

जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.

अती मात्रेत जेवणे किंवा अती आग्रह करून वाढणे टाळावे !

अती मात्रेत जेवल्याने वात, पित्त आणि कफ हे तिघेही बिघडतात. हे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. आजकाल लग्नसमारंभांचे दिवस असल्याने आवडीचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे घडू शकते. आरोग्य राखण्यासाठी अती प्रमाणात जेवणे टाळायला हवे.

पाकिटबंद अन्न, ते अन्न नव्हेच…!

ज्याचे विज्ञापन करावे लागते, ते अन्न नाही. पोळी, भात, भाकरी, वरण, तूप, भाज्या, कोशिंबीर आणि विविध उसळी यांचे विज्ञापन करावे लागते का हो ? निसर्गातून प्राप्त झालेले आणि सहस्रो वर्षांपासून मनुष्यप्राणी जे ग्रहण करतो, ते हे खरे अन्न !