हडपसर (पुणे) परिसरात पालखीच्‍या मार्गावर गोळा झालेला कचरा त्‍वरित हटवला !

मुंढवा क्षेत्रिय कार्यालयाच्‍या घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाने पालखी प्रस्‍थानानंतर त्‍वरितच कचरा गोळा केला. क्षेत्रीय कार्यालयाच्‍या परिसरातील सोलापूर आणि सासवड महामार्गावर हा कचरा गोळा करण्‍यात आला.

आधारकार्ड नसणार्‍यांना उपचार नाकारल्‍यास कारवाई !

आता बांगलादेशी घुसखोरांना विनामूल्‍य उपचारांसाठी महापालिकेने जणू परवानाच दिला आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

आपल्यासमवेतच्या लोकांविषयी कृतज्ञ राहिल्यास मानसिक आरोग्य सुधारते ! – संशोधन

कुटुंबीय, सहकारी यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्यासह भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करत राहिल्यास कृतज्ञतेला आध्यात्मिक आधार लाभून मानसिक आरोग्यासह जीवन आनंदी अन् समाधानी होण्यासही चालना मिळते, हे लक्षात घ्या !

आज ‘नो हॉँकिंग डे’ पाळा !

ध्‍वनीप्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्‍य यांची हानी होत असल्‍याने पोलिसांनी हॉर्न (भोंगा) न वाजवता या उपक्रमाला सकारात्‍मक प्रतिसाद देण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

केंद्र सरकारकडून ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांवर बंदी

भारतात सट्टेवर आधारित असणार्‍या, खेळणार्‍याला हानी पोचवणार्‍या आणि व्यसनाधीन बनवणार्‍या ३ प्रकारच्या ऑनलाईन खेळांना अनुमती दिली जाणार नाही.

सिंधुदुर्ग : आयी गावातील आरोग्य उपकेंद्र गत ६ मासांपासून बंद !

६ मास नागरिकांना आरोग्य केंद्रासारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून न देणे प्रशासनाला लज्जास्पद ! प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना आंदोलन अन् उपोषण करावे लागत असेल, तर प्रशासन हवे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

यंदाच्‍या वारीमध्‍ये ‘आनंदडोह’ हा एकपात्री नाट्यप्रयोग दाखवणार !

३३८ व्‍या पालखी सोहळ्‍यानिमित्त संवाद, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील राष्‍ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत वारीच्‍या मार्गावर अभिनेता योगेश सोमण यांच्‍या अभियानातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत.

दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

दूरचित्रवाणीमुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीचा व्यक्तीच्या भावना आणि वर्तन यांवर प्रभाव पडतो का ? मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे का ? अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मनःशक्ती केंद्राने जवळपास १ सहस्र ५०० पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली….

आजच्या पिढीतील संस्कारहीनता दर्शवणारी काही उदाहरणे !

एकदा आगगाडीत बसलेली २ लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने ठोसा लगावल्याप्रमाणे हाताची मूठ वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनी दुसर्‍या मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करून गोळी मारल्याप्रमाणे केले.

मानसिक आजार लहानपणापासून स्मार्टफोन वापरल्यास बळावतात !

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘सेपियन लॅब्ज’ या संस्थेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. जर लहान वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिला, तर मोठे झाल्यानंतर त्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.