बेळगाव शहरातील खासगी रुग्णालयाची देयके पडताळण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना

अधिक देयक आकारणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची आणि परवाना रहित करण्याची चेतावणी

शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

शिवसेनेकडून रुग्णालयातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

येत्या २ दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन १० वीच्या परीक्षेविषयी सविस्तर चर्चा करणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

आम्ही न्यायालयापुढे आमचे म्हणणे मांडू. न्यायालय याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग मुलांना होण्याच्या शक्यतेविषयी सावध रहावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना संसर्ग होण्याचे अनुमान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निराधार लोकांना अन्नधान्य संचाचे वाटप

निराधार लोकांना येथील विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने अन्नधान्याच्या ५१ संचांचे वाटप करण्यात आले.

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’  

कोरोना महासाथीच्या पार्श्‍वभूमीवर भारतात ठिकठिकाणी बर्‍याच डॉक्टरांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाझार करणे किंवा डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण दगावणे यांसारखी अनेक प्रकरणे बाहरे आली. अशा कर्तव्यशून्य आणि भ्रष्ट डॉक्टरांवर कारवाई करण्याविषयी आय.एम्.ए. मूग गिळून गप्प बसते.

कोल्हापूर शहरातील कोरोना केंद्रात रुग्णांना विनामूल्य उपचार !

गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना १२ कोरोना केंद्रात भोजन, औषध आणि वैद्यकीय सेवा विनामूल्य दिली जात आहे.

सोलापूर येथील नवनीत रुग्णालयाला महापालिकेकडून नोटीस

नवनीत या खासगी रुग्णालयातील रुग्ण परिसरात मुक्तपणे फिरत असून रोगाचा प्रसार करत असल्याने महानगरपालिकेकडून रुग्णालयाला नोटीस देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुलांच्या ‘हिमोग्लोबिन’ची तपासणी करण्यात येणार !

लहान मुलांचे ‘हिमोग्लोबिन’ न्यून असल्यास त्यांना कोरोनाचा अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने १८ वर्षे वयाखालील सर्व मुलांची ‘हिमोग्लोबिन’ तपासणी करणार.

क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करणारी तरुण मुले !

आत्महत्या करणार्‍यांमध्ये १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.  पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे.