कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म करू नये ! – तज्ञांचा सल्ला

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड-१९ च्या तज्ञांनी कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींना पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म न करण्याचा सल्ला दिला आहे.

कायदा खात्याकडून शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध

‘सक्सेशन’, ‘विल’ आदी ‘नोटरिअल’ सेवांसाठी शुल्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरता येणार आहे.

गोवा शालांत मंडळाची शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल

गोव्यातील शासकीय कर्मचारी आजपासून पूर्णसंख्येने कार्यालयात उपस्थित रहाणार

माहिती आयुक्तांनी जून मासातील माहिती अधिकाराखालील प्रकरणांवरील सुनावण्या जुलै मासात ढकलल्या

गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १ मासात घटून अर्ध्यावर  !

आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू मे २०२१ मध्ये

लसींच्या किमतींसाठी वाटाघाटी करण्यासाठी धोरणात्मक योजना आहे का ?

राज्यांनी लसींसाठी काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ वरून सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा हा प्रकार होय ! त्यापेक्षा मद्याची दुकानेच बंद केली, तर बर्‍याच समस्या सुटतील, हे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ?

कोरोना लस भरलेल्या सीरिंज फेकून देणार्‍या आरोग्य कर्मचारी नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंद

जमालपूरच्या शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कचरापेटीमध्ये कोरोना लस भरलेल्या २९ सीरिंज सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी येथील लसीकरण विभागाच्या प्रमुख असणार्‍या नेहा खान यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

लहान मुलांना स्थानिक प्रशासनासह महिला आणि बाल कल्याण विभागाने विनामूल्य मास्क द्यावेत ! – महेश गावडे, अध्यक्ष, समाजमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था

लहान मुलांची काळजी घेणे याचे दायित्व शासन आणि प्रशासन यांचेही आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांना विनामूल्य मास्क उपलब्ध करून द्यावेत.

खासगी ‘सिटीस्कॅन’ केंद्रात होणारी जनतेची लूट थांबवण्याची मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास मनसे कायदा हातात घेईल, अशी चेतावणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे.