भूतकाळातील स्मृती आनंददायी असतील, तर वर्तमानकाळही आनंदात जाईल. यासाठी वर्तमानकाळात सतत आनंदात रहा !

‘उत्सवाचा दिवस ‘येणार-येणार’ असे आपण म्हणतो. काल (१८.५.२०१७ या दिवशी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाचा दिवस गेला. काळ मागे जातो. त्याद्वारे आवरण काढले जाते आणि स्मृती ठेवली जाते. शब्द जातात; पण त्यांचा अर्थ रहातो.

प.पू. पांडे महाराज यांचे प्रबोधनपर उद्गार !

मुक्त होऊन केलेल्या साधनेमुळे म्हणजे कोणतीही चिंता न करता झालेल्या साधनेमुळे केवळ आनंदच प्राप्त होतो.

हिंदु राष्ट्रात असे राज्यकर्ते असतील !

अथर्ववेद कांड ७, सूक्त ९२, ऋचा १ मध्ये म्हटले आहे, राष्ट्राचे रक्षण करणारा, राष्ट्र समर्थ करणारा, राष्ट्राला साधन संपन्न करणारा, गुप्त रूपाने साम-दाम-दंड-भेद उपायांद्वारे दुष्ट शक्तींचे निर्मूलन करणारा, अशा प्रकारे उत्तम शासन करणारा, गुणवान, सर्वांना सुख मिळावे, असा मनापासून विचार करून राज्य करणारा राजा असावा.

साधकांनो, दीपावली म्हणजे काय, हे ठाऊक आहे का ?

दिवाळी झाली; परंतु त्याचा नेमका अर्थ काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. प.पू. पांडे महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनातून आपल्या जीवनाचा दीप प्रज्वलित करणे अर्थात् आत्मज्योत जागृत करणे म्हणजेच खरी दीपावली आहे, हे लक्षात येईल.

देवद आश्रमाचा आधारवड असलेल्या प.पू. पांडे महाराज यांच्या भेटीत प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी अनुभवलेले कृतार्थतेचे क्षण !

माझे मौनव्रत पूर्ण झाल्यानंतर प्रथमच आम्ही (मी आणि धर्मपत्नी पू. (सौ.) लक्ष्मी नाईक) २३.६.२०१७ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवद आश्रमात पोहोचलो.

कृतीद्वारे अध्यात्म शिकवून देवद आश्रमात स्फूर्ती, उत्साह आणि चैतन्य पसरवणारे प.पू. पांडे महाराज !

‘बोले तैसा चाले…’ ही म्हण सार्थ करणारे प.पू. पांडे महाराज ! ‘प्रतिदिन मला प.पू. पांडे महाराज यांच्यासमवेत ब्राह्म मुहूर्तावर पहाटे ५.३० वाजता फिरण्याचे भाग्य लाभते. त्या महासत्संगाच्या वेळी ते अध्यात्म, साधना, धर्मप्रसार, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता इत्यादींविषयी दैवी ज्ञान सांगत असतात.

साधकांनो आणि हिंदुत्वनिष्ठांनो, ‘कार्यक्रम म्हणजे काय ?’ हे प्रथम जाणून घ्या आणि त्यानुसार कृती करा !

‘सर्वसाधारणपणे सध्या समाजात बाह्य स्वरूपातून मन शरिराकडे वळवून (बहिर्मुख होऊन) कार्यक्रम केला जातो. सध्या समाजात कोणत्याही कार्यक्रमात नाचणे, गाणे, फटाके फोडणे इत्यादी गौण गोष्टींना महत्त्व दिले जाते.

वाचकांनो, दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचतांना ‘चैतन्यामुळे कार्य होत आहे’, असा भाव ठेवा !

‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे.

‘मी विश्‍वाचे एक अंग आहे’; म्हणून समष्टीच्या शुद्धीकरणासाठी साधना करणे, हीच खरी साधना !

‘व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा परिणाम कशावर होतो ?’ हे व्यक्तीने जाणून स्वतःमध्ये चैतन्य प्रकट करणे, ही साधना झाली. अशी साधना प्रत्येकाने केली, तर सर्वत्र चैतन्यच असेल. जिवंत असणे ही ईश्‍वराकडून मिळालेली संधी असते.

‘वातावरणाचा ऋतुप्रमाणे व्यक्तीवर परिणाम होतो’, हे जाणून पोषक वातावरण निर्माण होईल, अशा कृती कराव्या !

‘समाजाचा मी एक भाग आहे, माझा समाजाशी अनन्य संबंध आहे, हे समजले पाहिजे. ‘माझे समाजाशी काही देणे घेणे नाही’, असे म्हणून चालणार नाही. समाजात ज्या वाईट गोष्टी चालल्या आहेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now