परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या सहज संवादातील भावार्थ जाणून त्यांचे देवत्व ओळखणार्या आणि त्यांची बंडी शिवण्याची सेवा भावपूर्ण, शरणागतीने अन् नामजपासहित करणार्या सौ. पार्वती जनार्दन !
‘मला (सौ. पार्वती जनार्दन यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची बंडी शिवायची सेवा मिळाली होती. बंडी शिवण्याच्या सेवेनिमित्त माझे त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा आमच्यामध्ये झालेल्या संभाषणातील सूत्रे येथे दिली आहेत.