अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस ! या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे.

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली साधना करणारा जीवच भीषण आपत्काळात तरून जाईल !

गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने विदेशात होणारे ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ६ भाषांत ‘सर्वांत चांगला आध्यात्मिक दिवस कोणता ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन !

रामनाथी येथील संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे (दादा) यांनी मुलांवर केलेले धार्मिकतेचे अन् साधनेचे संस्कार !

या लेखमालेत आज २२ जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) आणि त्यांचे यजमान कै. वामनराव जलतारे यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहूया !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘भक्तवात्सल्य आश्रमा’त प.पू. भक्तराज महाराज यांच्या  गुरुपौर्णिमा महोत्सवाला आजपासून प्रारंभ !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे

गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २३ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जुलै आणि २४ जुलै या दिवशी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करतांना तासगाव (जिल्हा सांगली) येथील साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्या आधी सांधेदुखीमुळे मला बसतांना-उठतांना त्रास होत होता; परंतु सेवेमुळे माझा सांधेदुखीचा त्रास न्यून झाला आणि शरिराची हालचाल व्यवस्थित होऊ लागली.’

धर्मनिष्ठ अधिवक्त्यांनी केलेले साहाय्य आणि साधकांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने केलेली प्रार्थना यांमुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी सभागृह मिळण्यातील अडथळे दूर होणे

सर्वांनी परात्पर गुरु डॉक्टरांचा आर्ततेने धावा केल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवून मंत्री महोदयांकडून अनुमती मिळणे

‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सद्यःस्थितीत कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होता येणार का ?’, असे सर्वांना वाटत होते; मात्र अशा परिस्थितीत श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेता आला. वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सेवांमध्ये, तसेच गुरुपौर्णिमेच्या … Read more