सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवांतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

कार्यक्रमस्थळी सर्वांत अधिक देवगड येथे ५००, तर त्याखालोखाल कुडाळ येथे ४५०  उपस्थिती होती.

गुरूंना आवडणार्‍या धर्मकार्यात सहभागी होण्याचा निश्चय करा ! – ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

गुरुपौर्णिमेचा उद्देश केवळ गुरुचरणी नतमस्तक होणे, हा नसून या दिवशी गुरुसेवेची ही अमूल्य पर्वणी मिळते. आत्मज्ञान हे केवळ गुरूंमुळे प्राप्त होते, त्यासाठी नियमित गुरुसेवा करणे आवश्यक आहे. गुरूंना जे आवडते, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा.

वर्धा येथे ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला.

काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

जळगाव, चोपडा, धुळे, ब्रह्मपूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा ! प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे.

मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

१० जुलै २०२२ या दिवशी मदुराई (तमिळनाडू) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. यानंतर सौ. लक्ष्मी नायक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपौर्णिमेच्या संदेशाचे वाचन केले.

गुरूंविषयी श्रद्धा, भक्तीभाव निर्माण करा ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात १५३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये देहली, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथांची सूची

नाशिक येथील गोदावरी नदीला महापूर

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्याने रामगिरी महाराजांनी ‘गुरुपौर्णिमा कार्यक्रमात भाविकांनी येऊ नये’, असे आवाहन केले होते.

मुलुंड (मुंबई) येथे सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा स्थळाच्या प्रवेशद्वाराजवळ साधक बसलेल्या रिक्शावर झाड कोसळूनही साधक आणि रिक्शाचालक सुखरूप !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यरत असणार्‍या गुरुतत्त्वानेच सनातनच्या साधकांचे रक्षण केल्याचे दर्शवणारी घटना !