गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.

गुरुकृपायोगानुसारच्या साधनेत भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग यांच्या काही तत्त्वांचा समावेश असल्याने साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे

गुरुकृपायोगानुसार एकूण १२२ साधक संत झाले, तर १ सहस्र ८७ साधकांचा प्रवास त्या दिशेने चालू आहे. साधकांची शीघ्र उन्नती होण्याचे कारण हे की, गुरुकृपायोगामध्ये भक्तीयोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग या तीन प्रमुख साधनामार्गांतील काही साधनांचा समावेश आहे.

म्हणून ईश्वराला सनातनचे साधक जवळचे वाटतात।

सनातनचे आश्रम, म्हणजे आहेत चैतन्याचा स्रोत।
सनातनचे ग्रंथ, म्हणजे आहे ज्ञानाचा झरा।
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे सत्यनिष्ठ लिखाण।
सनातनमध्ये सर्वांचा उद्देश आहे ईश्वरप्राप्ती।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य केले आहे आणि करत आहेत. गुरुकृपायोग अलौकिक साधनामार्गाच्या निर्मितीविषयी त्यांचे कार्य या सूत्रांमधून जाणून घेणार आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले निर्मित ‘गुरुकृपायोग’ हा अष्टांग साधनामार्ग कलियुगासाठी अत्यंत आवश्यक आणि पुढे पुन्हा येणार्‍या त्रेता अन् द्वापर या युगांसाठीही उपयुक्त असणे

‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्‍या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’

गुरुपौर्णिमेला २५ दिवस शिल्लक

गुरुकृपायोगाचे महत्त्व निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक

श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही  नाही….

गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक

गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो. 

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.