अनेक सेवा सहजतेने आणि आत्मविश्वासाने करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील !     

मायाताई अखंड सेवारत राहून गुरुदेवांचे आज्ञापालन करण्याचा सतत प्रयत्न करतात. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अनेक समष्टी सेवांचे दायित्व असूनही तेवढ्याच गांभीर्याने त्या व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात.

भावपूर्ण सेवा करून परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे बनण्यासाठी प्रयत्न करणारे फोंडा, गोवा येथील श्री. प्रतीक जाधव (वय ३१ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी (२९.३.२०२३)  या दिवशी श्री. प्रतीक जाधव यांचा ३१ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

उपकार्यकारी अभियंता आणि सनातन संस्थेचे साधक नीलेश नागरे यांनी कृषीपंप देयकांची १४ कोटींची केली विक्रमी वसुली !

सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे यांनी स्वतः काही गावांमध्ये शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. त्यांनी शेतकर्‍यांना वीजदेयक भरण्याचे महत्त्व पटवून दिले. याचा परिपाक म्हणून मार्चमध्ये शेतीपंप ग्राहकांनी स्वयंप्रेरणेने वीजदेयकांचे ६८ लाख रुपये भरले !

सेवेची तीव्र तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेयांच्याप्रती अपार भाव असलेल्या पुणे येथील श्रीमती सुनीता देव (वय ७० वर्षे) !

‘श्रीमती सुनीता देवकाकूंच्या समवेत सेवा करतांना पुणे येथील साधिकांना काकूंची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भौतिकवादाच्या प्रभावाखाली असलेल्या जगताला अध्यात्माचा मार्ग दाखवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे दावोस, स्वित्झर्लंड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग !

श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग हे ‘स्की बूट’ (बर्फावरील खेळ खेळण्यासाठी बनवण्यात आलेले विशेष पद्धतीचे बूट) बनवणार्‍या जगविख्यात आस्थापनाचे मालक आहेत. त्यांची व्यावसायिक कारकीर्द उत्तम असल्याने त्यांच्याकडे सर्व भौतिक सुखसोयी आहेत; मात्र असे असूनही ‘आयुष्यात काहीतरी न्यून आहे’, असे त्यांना जाणवत होते.

राष्ट्राभिमान, सेवेची तळमळ आणि इतरांना साहाय्य करणारे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील श्री. सागर निंबाळकर (वय ४४ वर्षे) !

१.४.२०२३ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सागर निंबाळकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सातत्य आणि स्वतःच्या चुकांविषयी गांभीर्य असलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमातील श्री. पुंडलीक माळी (वय ६८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल नवमी (रामनवमी), ३०.३.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. पुंडलीक माळी यांचा ६८ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त मला बाबांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असलेले देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !      

‘श्री. निनाद गाडगीळ (निनाददादा) नेहमी येता-जाता साधकांची विचारपूस करतो. तो नेहमी समारून येणार्‍या साधकाला स्मित करून प्रतिसाद देतो. अशा लहान लहान कृतींमधून त्याचा साधकांविषयीचा प्रेमभाव व्यक्त होतो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करून आश्रमातील चैतन्याचा लाभ करवून घेऊन स्वतःमध्ये अंतर्बाह्य पालट करून घेणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

कु. अपाला दीड वर्षापासून तिच्या आजोबांकडे राहून (श्री. अशोक रेणके, फोंडा येथे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन-जाऊन साधना करत आहे. त्या वेळी मला तिच्यात पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे

रामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजलताईने भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्‍या दिवशी सहस्र पटींनी कार्यरत असणारे प्रभु श्रीरामाचे चैतन्‍य प्रत्‍यक्षात ताईच्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगात अनुभवायला मिळाले.