केंद्रशासनाकडून म्हादई प्रवाह प्राधिकरण अधिसूचित

म्हादई प्रवाह प्राधिकरणाची स्थापना करण्यासाठी म्हादई जल व्यवस्थापन योजना २०२३ सिद्ध करण्यात आली आहे. ही योजना २२ मे २०२३ या दिवशी अधिसूचित करण्यात आली आहे. आता म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्याविरुद्धच्या लढ्यामध्ये गोव्याला प्राधिकरणाचे साहाय्य मिळेल, ही आशा !

भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी अध्यात्माद्वारे मने प्रज्वलित करणे आवश्यक ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री, गोवा

प्रत्येकाचे मन प्रज्वलित करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे सामूहिक सहभागातून झाल्यास भारताला विश्वगुरु बनवता येईल. हा संदेश तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत पोचवला पाहिजे, असे आवाहन गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे यांनी केले.

गोव्यात जुलै मासात ऊर्जाविषयक २ महत्त्वाच्या बैठका होणार

भारत हा सी.ई.एम्.चा संस्थापक सदस्य आहे. सी.ई.एम्.चे सचिवालय फ्रान्समध्ये पॅरिस येथे आहे. या वेळी केंद्रीय मंत्री आर्.के. सिंह म्हणाले, सी.ई.एम्. हा मंच जागतिक स्तरावर स्वच्छ ऊर्जा समुदायाला एकत्र आणतो. स्वच्छ ऊर्जेविषयी नावीन्यता जाणून घेण्याची संधी या निमित्ताने मिळत असते.

गोवा : ५० वर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर वन खाते यंदा सर्वसमावेशक वन व्यवस्थापन योजना सिद्ध करणार

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील वनक्षेत्र भविष्यात सुरक्षित रहाणार आहे. यासाठी राज्यातील वन अधिकारी दुसर्‍या राज्यांना भेट देऊन तेथे वन व्यवस्थापन चांगल्या रितीने कसे केले जाते ?, याचा अभ्यास करणार आहेत.

वन्यजीव मंडळाची ४ वर्षांत एकही बैठक झाली नाही ! – पर्यावरणतज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, गोवा

राज्यातील जंगलांत मोठ्या प्रमाणात वन्यजिवांचा अधिवास आहे. त्यांना संरक्षण देण्यासाठी नूतन वन्यजीव मंडळाने काम करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वर्ष २००१ ते २०२१ या कालावधीत ५ वाघांचा मृत्यू झाला, ही चिंताजनक गोष्ट आहे.

गोवा : सांकवाळ येथे सापडलेल्या देवीच्या मूर्तीची तेथेच प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात हिंदूंकडून विचारविनिमय

खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.

वास्को, गोवा येथे २७ मे या दिवशी सी-२० परिषदेचे आयोजन !

जागतिक स्तरावरील सामाजिक, अशासकीय, धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना ‘सी-२०’ परिषदांच्या माध्यमातून एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात.

गोवा राज्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाण्याची पातळी घटल्याने पाणीटंचाईचे सावट !

राज्यातील महत्त्वाच्या ६ पैकी ३ धरणांची पाण्याची पातळी पुष्कळ खालावल्याने आणि पावसाचे आगमन उशिरा होण्याची चिन्हे असल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट राज्यावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

गोव्यात जून मासात ‘जी-२०’च्या ३ बैठका होणार !

५ ते ७ जून या कालावधीत तिसरी ‘इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रूप’ची, १९ ते २० जून या कालावधीत चौथी पर्यटन कृती गटाची बैठक आणि २१ अन् २२ जून या दिवशी पर्यटनमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली.

आध्यात्मिक मार्गाने विश्‍वातील समस्यांचे निराकरण शक्य ! – प्रा. डॉ. शशी बाला, आंतरराष्ट्रीय समन्वयक, ‘सी २०’

विश्‍वातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न असून संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यांत पुष्कळ पुढे आहेत; पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे.