स्वामी आत्मबोधानंद यांचे उपोषण १९४ दिवसांनंतर मागे

‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन’च्या महासंचालकांकडून मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन : अशी कितीही आश्‍वासने दिली, तरी ती पूर्ण होण्याची शक्यता अल्पच आहे, हे आतापर्यंतच्या उदाहरणांवरून लक्षात येते ! आश्‍वासन द्यायचेच होते, तर त्यासाठी एका साधूला १९४ दिवस उपोषण करण्यास का लावले ?

गोमांसबंदी, नद्यांची स्वच्छता अशी सूत्रे निवडणुकीच्या प्रचारात हवीत ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

भारतातून गोमांसाची निर्यात कधी बंद होणार ?, नोटाबंदीमुळे झालेली हानी कशी भरून काढणार ?, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्येची समस्या कशी सोडवणार ? … अशी निवडणुकीच्या प्रचारासाठी महत्त्वाची सूत्रे असायला हवीत – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

गंगानदीच्या स्वच्छतेसाठी संत आत्मबोधानंद (वय २६ वर्षे) यांचे १८० दिवसांपासून उपोषण

यापूर्वी ८६ वर्षीय स्वामी सानंद यांनी गंगानदीच्या स्वच्छतेसाठी १११ दिवस उपोषण करूनही भाजप सरकारने त्यांची कोणतीही नोंद न घेतल्याने त्यांनी प्राणत्याग केला होता. त्यामुळे असे सरकार संत आत्मबोधानंद यांच्या उपोषणाची नोंद घेत नाहीत, यात आश्‍चर्य ते काय ?

गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता !

गंगानदीच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून त्यांनी उपोषणाला आरंभ केला होता. भाजपशासित उत्तराखंडमधील डेहराडून येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

प्रा. जी.डी. अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधानांसह नितीन गडकरी यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवा !

गंगा नदी स्वच्छतेच्या मागणीसाठी ज्येष्ठ पर्यावरणवादी जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांनी १११ दिवस उपोषण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. अग्रवाल यांच्या मृत्यूच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती उत्तरदायी आहेत

गंगानदीसाठी १११ दिवसांपासून उपोषणाला बसलेले संत गोपालदास एम्स रुग्णालयात भरती

गंगानदीला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करतांना जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांचा मृत्यू झाल्यानंतर हरिद्वारच्या मातृसदन आश्रमात उपोषणाला बसलेले संत गोपालदास यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ब्रिटीश म. गांधी यांच्या उपोषणाची नोंद घ्यायचे, आताचे शासनकर्ते तेही करत नाहीत !

हरियाणाच्या गुहाना येथे रहाणारे संत गोपालदास गंगानदीला वाचवण्यासाठी गेल्या १११ दिवसांपासून उत्तराखंडच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करत होते. १२ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी त्यांना बलपूर्वक एम्स रुग्णालयात भरती केले.

गंगानदी के लिए १११ दिन से अनशन कर रहे संत गोपालदास को पुलिसने एम्स में भरती किया !

गंगानदी के लिए १११ दिन से अनशन कर रहे संत गोपालदास को पुलिसने एम्स में भरती किया !

हा मृत्यू नाही, तर षड्यंत्राद्वारे केलेली हत्या आहे ! – स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा आरोप

जी व्यक्ती सकाळी चांगल्या स्थितीत होती आणि ती स्वतःच्या हाताने प्रसिद्धीपत्रक बनवते, १११ दिवस तपस्या करून आश्रमात असतांना चांगली असते; मात्र एम्स रुगणालयात नेल्यावर एकाच रात्रीत तिचे निधन होते….

हिंदु राष्ट्रातच गंगाभक्तांवर अन्याय होणार नाही, हे जाणा !

गंगानदीच्या अस्तित्वासाठी १११ दिवस आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रा. जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी सानंद यांचा मृत्यू झाला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना याविषयी पत्र लिहूनही भाजप सरकार निष्क्रीय राहिले.


Multi Language |Offline reading | PDF