अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक !

सहस्रो महिलांची दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण

धर्मांध युवकाकडून हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीशी लग्न आणि धर्मांतरासाठी दबाव

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्यानंतरही धर्मांध युवक हिंदु मुलींना फसवण्याचे दुःसाहस करतात, यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !

वैद्यकीय अभ्यासक्रमास (एम्.बी.बी.एस्.) प्रवेश देतो म्हणून १३ जणांची फसवणूक !

अशा प्रकारे अवैधरित्या वैद्यकीय आणि अन्य अभ्यासक्रम यांमध्ये प्रवेश मिळवून देणार्‍यांचे जाळे असण्याची शक्यता आहे. ते शोधून नष्ट करणे आवश्यक आहे.

चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवणे भारताला महागात पडले !

चीन आक्रमकपणे कारवाया करत असतांना आमचे डोळे का उघडले नाहीत ? भारताने नेमकी चूक कुठे केली ? भारताने तिबेटला चीनचा भाग समजण्याची चूक केली आणि पंचशीलच्या सिद्धांतांवर डोळे झाकून विश्वास ठेवला. शांती टिकवून ठेवण्यासाठी आपण युद्धाची कूटनीती विसरलो. परिणामी भारताचे स्वतःच्या लष्करी सिद्धतेकडे दुर्लक्ष झाले !

संभाजीनगर येथे खोट्या खरेदीखताद्वारे भूमीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी तलाठी आणि मंडळ निरीक्षकासह ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रशासनातील अधिकारीच अयोग्य कृती करत असतील, तर भ्रष्टाचार कसा थांबणार ? संबंधितांच्या विरोधात केवळ गुन्हा नोंदवून न थांबता त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) टपाल कार्यालयाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक

आतापर्यंत विश्‍वासार्ह वाटणार्‍या टपाल खात्यातही भ्रष्टाचार होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेने गुंतवणूक कुठे करावी ? हा प्रश्‍न निर्माण होत आहे !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभवसह १४ जणांवर नाशिक येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यासह १४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍यांना अटक

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाने हिरालाल जैन आणि प्रमोद कातरनवरे या व्यापार्‍यांना अटक केली. शासनाचा महसूल बुडवणार्‍यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

राज्यातील ५ राष्ट्रीयीकृत बँकांतील १२ प्रकरणांत १३ सहस्र २५७ कोटी रुपयांचा अपव्यहार आणि फसवणूक !

अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे.

जनतेचे पैसे वापरून जनतेलाच आमीष दाखवणारे सर्व राजकीय पक्ष !

‘निवडणुकांच्या वेळी सर्वच राजकीय पक्ष जनतेला विविध सुविधा देण्याचे आमीष दाखवतात. त्यात तो पक्ष स्वतःचा एकही पैसा खर्च करत नाही आणि जनताही त्यांच्या या आमिषांना भुलते. विशेष म्हणजे, भारतातील लोकशाहीत हा फसवेगिरीचा खेळ गेली ७४ वर्षे चालू आहे ! हे कुणाच्याच लक्षात आलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले