ठाणे येथे बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांना अटक !

बनावट नोटा चलनात आणणारे राम शर्मा आणि राजेंद्र राऊत यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ कोटी रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍यांना कठोर शिक्षा करावी !

बडनेरा येथे ‘लव्ह जिहाद’प्रकरणी २ धर्मांधांना अटक

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदु समाज धर्मांतरासाठी कधीही कुणावर बळजोरी करत नाही ! – आमदार नीतेश राणे, भाजप

एखाद्या हिंदु युवकाने मुसलमान युवतीशी लग्न केल्यावर धर्मांतरासाठी तिच्यावर बळजोरी केल्याचे एकतरी उदाहरण अबू आझमी यांनी दाखवावे.

‘छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’साठीची आरक्षित जागा बळकावण्याचा वक्फ बोर्डाचा प्रयत्न जागृत ग्रामस्थांमुळे फसला !

दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीचे ‘लेटरहेड’ आणि शिक्का वापरून, तसेच सरपंचांची बनावट स्वाक्षरी करून येथील पीर देऊळाची ४ एकर भूमी ‘महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ संभाजीनगर’ यांच्याकडे नोंद करण्यासाठी संगनमत करून फसवणूक केल्याच्या प्रकरणी ११ धर्मांधांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.

विदेशात नोकरीचे आमीष दाखवून फसवणार्‍या बनावट दलालांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

हे दलाल करत असलेली कृती ही मानवी तस्करीच असल्याने त्यांच्या विरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तस्करी विरोधी तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत दिली.

रामदासी संप्रदायाच्या मठाच्या मालकीची ४०० एकर भूमी परस्पर विकण्याचा प्रकार !

विक्री थांबवण्याची मंदिर संस्थानचे विश्वस्त रामचंद्र गोसावी यांची मागणी

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गोवा पुरातत्व खात्याने अडीच वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांनी केले होते दुर्लक्ष !

संबंधित पोलिसांचे भूमी माफियांशी संबंध होते का ? हे शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! जनतेनेही हे प्रकरण गांभीर्याने घेऊन घोटाळेबाजांवर आणि त्यांना साहाय्य करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत !

तोतया पोलीस अधिकार्‍याकडून गायकाची अडीच लाखांची फसवणूक !

संगीत कार्यक्रम सादर करण्यासाठी ८ लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून गायक अशोक निकाळजे यांची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पातूर (जिल्हा अकोला) येथे मृत युवकाला जिवंत केल्याचा बनाव पोलिसांनी हाणून पाडला !

पातूर तालुक्यातील विवरा गावातील प्रशांत मेसरे या युवकाचा अंत्यसंस्कार होत असतांनाच तो तिरडीवर उठून बसला होता; मात्र हा केवळ भोंदूगिरीचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या आदेशाला खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून वाटाण्याच्या अक्षता !

‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ ! भरमसाठ तिकीटदर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे जनविरोधी रूप उघड !